March 30, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

वेळापुर पोलीस ठाणे हद्दीतील तांदुळवाडी प्रतिबंधित पान मसाला जप्त

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज
अन्न व औषध प्रशासन सोलापूर कार्यालयाचे सहायक आयुक्त श्री प्रदीप राऊत यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की तांदुळवाडी येथील दुकानदार सुनील शिवाजी कदम यांनी आपल्या गोदामात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू साठवणूक करून विक्री व परिसरात वितरण करीत आहेत. 

त्यावरून त्यांनी नजिकचे उपलब्ध अन्न सुरक्षा अधिकारी श्री प्रशांत कुचेकर यांना सदर गोदामाची तपासणी करण्यास सांगितले. त्यावरून तपासणी केली असता सदर गोदामात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू यांचा एकूण १४५१४/- रुपये किमतीचा साठा विक्रीसाठी साठवणूक केलेला असल्याचे आढळुन आले. सदर साठा जागेवर जप्ती पंचनामा करून सील करून ताब्यात घेण्यात आला. आरोपी सुनील शिवाजी कदम यांचेवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा शिक्षपात्र कलम ५९ व भा द वि कलम १८८, २७२, २७३, ३२८ कलमासह वेळापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्री प्रशांत कुचेकर यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न). श्री. प्र. मा. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

Leave a Reply