October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

विविध मागण्यांसाठी बार्शी-लातूर रस्त्यावर रस्ता रोको..मागण्यांची पुर्तता लवकरच न झाल्यास तीव्र आंदोलन..शंकर गायकवाड

बार्शी ;महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

अतीवृष्टीचे सरकारने पंचनामे न करता सरसकट जिरायत एकरी ५०हजार तर बागायतास १लाख रूपये लवकरात लवकर खातेवर जमा करावे, सर्वच पिकांना शंभर टक्के पिकविमा मंजूर करा, जामगाव-वाणेवाडी-कुसळंब रस्ता बनवा, मागील सन २०१८-१९चा दुष्काळ निधी तात्काळ खातेवर जमा करा आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बार्शी-लातूर रस्त्यावरील वाणेवाडी फाट्यावर  रस्ता रोको करण्यात आला त्यावेळी गायकवाड यांनी मागण्यांची पुर्तता लवकरच न झाल्यास राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलने केली जातील व मंत्र्यांनाही घराबाहेर पडणे मुस्किल केले जाईल असा खणखणीत इशाराही यावेळी दिला. मागण्यांचे निवेदन पांगरीचे मंडल अधिकारी विशाल नलवडे,जि.प.बांधकाम विभागाचे आयुब शेख,सपोनी शिवाजी जायपत्रे यांना देण्यात आले.

त्यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड, बापू गरदडे, समाधान यादव, शंकर सुर्वे, गणेश लावंड, विश्वास लोखंडे, अंकुष यादव, बाबा यादव, हनुमंत लोखंडे, खंडू यादव, परसु यादव, अभिजीत लोखंडे, कृष्णा गरदडे, विठ्ठल गरदडे, गणेश यादव, हनुमंत यादव, बालाजी सटाले, कालिदास यादव, महेश खुरंगळे, दिगंबर गरदडे, विजय यादव, माणिक गरदडे, रंजीत गरदडे, बापू खुरंगळे, विजय शिंदे, बंटू सुर्वे, पांडुरंग यादव, सचिन लोखंडे, शेखर लावंड, आनंद शिंदे, शशिकांत यादव, महादेव यादव, रंजीत गरदडे, सतीश गरदडे आदिंसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक शिवाजी जायपत्रे व त्यांचे  सहकारी कांतीलाल लाड,जनार्दन शिरसट,विलास भराटे,मंडलिक, केकान,महेश डोंगरे,यादव ,सुर्यवंशी ,शेख  यांनी ठेवला होता.

Leave a Reply