March 30, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते रणजितसिंह डिसले गुरुजींचा सत्कार

सोलापूर;-महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  प्रवीण दरेकर यांच्या हस्ते भारताचे नाव व बार्शी चे नाव सोलापूर जिल्ह्याचे नाव जगात गाजवणारे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय सात कोटी रुपयांचे बक्षीस मिळवणारे ग्रामीण भागात शाळेचे शिक्षक रणजीत डिसले यांना पुढील कार्यास शुभेच्छा व अभिनंदन करण्यासाठी बार्शी येथे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर खास आले होते .तसेच या सत्कार समारंभ प्रसंगी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत ,भाजपचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख, नगराध्यक्ष आशिफ तांबोळी, सोजर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण बारबोले ,पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील ,यांच्या उपस्थितीत रणजीत डिसले गुरुजींचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच सोजर इंग्लिश मिडीअम येथे आमदार राजेंद्र राऊत, अरुण बारबोले, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी पंचायत समिती सभापती अनिल डिसले ,माजी नगराध्यक्ष रमेश  पाटील व भाजपचे कार्यकर्ते यांच्या वतीने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व भाजपचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना प्रवीण दरेकर यांनी पदवीधर मतदार संघातील पराभव मान्य केला व नवीन मतदार नोंदणी, मतदार पर्यंत न पोहोचल्यामुळे विरोधकांनी तीन पक्ष एकत्र येऊन व राष्ट्रवादीचे पश्चिम महाराष्ट्र भागात संस्था वर वर्चस्व असल्यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला .या पुढील काळात निश्चितच पक्षाच्यावतीने आत्मपरीक्षण करून त्रुटी दूर करू.

Leave a Reply