June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

विद्युत पुरवठा चार दिवसात सुरूळीत न झाल्यास अधिकाऱ्यांना टांगून मारू ;शंकर गायकवाड

(व्हिडिओ)👇

बार्शी-तुळजापूर मार्गावर रस्ता रोकोवेळी दिला इशारा

बार्शी ;महाराष्ट्र स्पीड न्युज


खंडीत झालेल्या विद्युत पुरवठ्यामुळे पाण्याअभावी जनावरांचे हाल होऊन पिकेही करपू लागली म्हणून आज अखेर बार्शी-तुळजापूर रस्त्यावर बावी फाट्यावर शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली कोरोनाच्या नियमांचे पालन करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.हवालदार राजेंद्र मंगरूळे यांनी निवेदन स्विकारले.

यावेळी शंकर गायकवाड यांनी महावीतरणवर कडाडून टिका केली व बेकायदेशीरपणे खंडीत केलेला विद्युत पुरवठा चार दिवसाच्या आत सुरूळीत न झाल्यास अधिकाऱ्यांना शेतकरी टांगून मारतील असा इशाराही यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गायकवाड यांनी दिला. त्यावेळी अशोक आगलावे, मुसा मुलांनी, राहुल आगलावे, अमोल आगलावे, आप्पासाहेब आगलावे, आमीन शेख, सचिन आगलावे, मुजाहीद शेख, अमोल लोंढे ,अरविंद करडे, आबासाहेब करडे, सुरेश पागे, विनोद आगलावे, सुरेश लोंढे, नानासाहेब गुंड, अतुल जाधव, संतोष जाधव, हनुमंत पवार, बाळू पवार, नवनाथ काळे, सदानंद आगलावे, बालाजी लोंढे, कविश्वर आगलावे, दिलीप आगलावे, दयानंद आगलावे, धनाजी आगलावे, प्रशांत जाधव, समाधान पिसाळ, प्रमोद आगलावे, अमर आगलावे, बालाजी पाटील, गणेश पाटील, शिवाजी धुमाळ, राजेंद्र फोपले आदींसह पंचक्रोशितील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply