March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणारा शिक्षक, स्वतःच आयुष्य संपवायला का निघालाय…

बार्शी : येथील नूतन मराठी विद्यालय मध्ये अनुकंपा तत्त्वावर केवळ जातीय मानसिकतेतून गेली सात वर्षापासून नियुक्ती न केल्याचा आरोप रोहन गायकवाड यांनी केला आहे,यामुळेच त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

गेल्या सात वर्षापासून शिक्षण संचालक पुणे शिक्षणाधिकारी प्राथमिक सोलापूर तसेच संबंधित सर्व कार्यालयाने वारंवार आदेशित करून संस्थेने तसेच शाळेने कोणतीही दखल घेतली नाही. यास्तव शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प. सोलापूर यांनी रोहन गायकवाड यांचा पूर्वलक्षी प्रभावाने प्रस्ताव सादर करीत नाही म्हणून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका चे वेतन स्थगित केले होते. अनुकंपा तत्वावर रोहन गायकवाड यांना तात्काळ नियुक्ती देऊन त्यांचा प्रस्ताव वैयक्तिक मान्यतेसाठी तात्काळ सादर करण्याचे स्पष्ट आदेश शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड यांनी दिले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रोहन गायकवाड हे गेली सात वर्ष अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळावी यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेकडे व शिक्षण अधिकारी कार्यालय यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून वारंवार आदेशित करून देखील केवळ जातीय मानसिकतेतून संस्थेच्या संचालिका या नियुक्ती प्रस्ताव शिक्षण अधिकारी यांना सादर करीत नाहीत यापूर्वी देखील त्यांनी जाणीवपूर्वक त्रुटीयुक्त प्रस्ताव सादर केला होता, त्रुटींची पूर्तता करण्यासाठी शिक्षण अधिकारी यांचेकडून वारंवार आदेशित करून देखील संस्था केवळ जातीय मानसिकतेतून प्रस्ताव सादर करीत नाही, असे रोहन यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे रोहन गायकवाड यांचे वर तसेच त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक व मानसिक खच्चीकरण होत असल्याने दिनांक 16 डिसेंबर 2020 रोजी संस्था कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्यामुळे आत्मदहन करत असल्याचे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply