विद्यार्थिनींना मासिक पाळीविषयी रणरागिणी मंचचे मार्गदर्शन

ठाणे,
दर महिन्याला स्त्रीला येणारी मासिक पाळी ही स्त्रीच्या जीवनातील अतिशय नैसर्गिक अशी घटना. या अफाट निसर्गचक्राचाच तो एक भाग. हीच गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, पाळीविषयी समाजात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी, मासिक पाळीच्या काळातील आरोग्य आणि स्वच्छता याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी शनिवारी रणरागिणी मंच मार्फत गंगाजल पाटील यांनी मुलींच्या जिव्हाळ्याच्या विषयावर ‘चला तिला समजून घेवू’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता भगत यांनी अतिशय उत्तम संवाद विद्यार्थीनी सोबत साधला व एनसीपी महिला अध्यक्षा, शहापूर रंजीता दुपारे यांनी मासिक पाळी विषयी असणार्या श्रध्दा अंधश्रद्धाचे यावर मार्गदर्शन केले.
प्रकल्प विद्यालय येथील पुजारी मॅडम यांनी मासिक पाळी दरम्यान मुलींनी आहारात काय काळजी घेतली पाहिजे यावर अतिशय सविस्तर मार्गदर्शन केले.
चर्चासत्रास सर्व उपस्थित विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन सौ संगीता करवंदे यांनी केले.
ज्या भावना कधीही व्यक्त केल्या जात नाहीत अशा किशोरवयीन मुलींच्या मनातील भावना त्यांनी कशा व्यक्त कराव्यात याबाबतचे मार्गदर्शन व सत्राच्या माध्यमातून विद्यार्थिनीं सोबत संवाद साधण्यात आला. मासिक पाळीबद्दलच्या शंकांचे मळभ चर्चासत्र च्या माध्यमातून दूर करण्यात आले. छान प्रतिसाद मिळाला, यावेळी मुलींनी ऋतुचक्रचे माहिती घेत स्वागत केले गेले. मुलींमध्ये होणार्या शारीरिक, मानसिक बदलांची जाणीव करणारे असे प्रबोधनपर चर्चासत्र झाले पाहिजे. मोकळेपणाने समाजात आपण इतर अनेक विषयांवर बोलतो.. जनजागृती करतो, तितक्याच मोकळेपणाने ज्या मासिकपाळीच्या रक्तावर गर्भ वाढतो.. पोसला जातो.. त्या मासिकपाळी बद्दल, स्त्रीच्या गर्भाशयातील होणार्या या अभुतपुर्व बदलाबद्दल, मोकळेपणे बोलले जावे, म्हणजे खर्या अर्थाने समाजात बदलाचे वारे वाहू लागतील, असे विचार उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.