वाळु चोरी, पानगावच्या पाच जनावर गुन्हा दाखल

बार्शी ;
वाळुची विनापरवाना वाहतुक केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने कारवाई करत 18 लाख 41 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी पोना.लालसिंग राठोड यांच्या फिर्यादीवरून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात पाच जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
# पथकाने नागेष हरीदास चव्हाण (चालक), व राहूल अंकुश भिसे (मालक) यांचे कब्जातून एक टाटा कंपनीचा माँडेल क्रं.1613 लाल रंगाचा ट्रक आरटीओ MH 13 AX 3013 ट्रक व 4 ब्रास वाळू , राहूल अंकुष भिसे (मालक)यांचे कब्जातूनएक क्रं.MH 13 DE.6320 गजगा कलरची ब्रिजा कार , आण्णा प्रल्हाद चव्हाण (मजूर)यांचे कब्जातून एक आयटेल कंपनीचा सिल्व्हर रंगाचा मोबाईल असा 18,41,500 00 वर्णनाचा व किंमतीची वाहने, वाळू, खोरे व पाटया व मोबाईल जप्त करण्यात आले.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्षनाखाली सहा.पोलीस निरीक्षक शाम बुवा, बिरूदेव पारेकर,श्रीकांत गायकवाड, सलीम बागवान, परषुराम षिंदे, राहुल सुरवसे यांच्या पथकाने केली.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बार्शी हद्दीत अवैध वाळु चोरी रोखण्याकरीता व कार्यवाही करीता पेट्रोलिंग करीत असताना बळेवाडी येथे आले असता, गोपनिय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, बार्शी ते बळेवाडी रोडवर एक ट्रक क्रं MH.13 AX 3013चोरीची वाळू घेवून बळेवाडीच्या दिषेने येत आहे.
बळेवाडी येथील हनुमान मदीरासमोरील बार्शी ते कोरफळे रोडवर थांबलो असता काही वेळातच कोरफळे रोडकडून एक लाल रंगाचा टाटा कंपनीचा ट्रक येताना दिसला तो जवळ येताच बातमीनुसार ट्रक क्रं.MH.13 AX 3013 हाच असल्याने त्यातील चालकास थांबण्याचा ईशारा केला असता सदर ट्रक चालकाने सदरचा ट्रक रस्त्याच्या बाजूस घेवून उभा केला.त्यावर सदर ट्रक चालकास व ट्रकमधील उर्वरीत 03 इसम यांचेसह खाली उतरवले.नावे विचारली असता नागेष चव्हाण, वय 37 वर्षे,व्यवसाय – चालक ,रा. पानगांव , आण्णा चव्हाण,वय -40 वर्षे रा. पानगांव, धनाजी कानगुडे ,वय -34 वर्षे, रा. पानगांव, दाउद शेख ,वय -62 वर्षे ,सर्व रा. पानगांव ता.बार्शी अशी असल्याची सांगितले.
सदरची चोरीची वाळू ट्रक मालक राहूल अंकुश भिसे,राह.-पानगांव ता.बार्शी याचे सांगणेवरून पासलेवाडी बोपले ता.मोहोळ येथील सीना नदीचे पात्रातुन 1.गणेष श्रीराम रा-गलंदवाडी,ता. मोहोळ 2.समाधान श्रीराम रा.सदर,3.दिनकर ढेरे बोपले ता.मोहोळ यांनी चोरून वाळु काढुन साठा करून विक्री करीता ठेवलेल्या ठिकाणाहून साठा केलेली वाळु यावेळी सोबत असले मजुरांना घेवुन वाहनांमध्ये इकडील परीसरात विक्रीकरीता भरून आणले असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना वाळु उपसा करणेबाबत षासनाची परवानगी व राँयल्टी बाबत विचारपुस करता परवानगी नसल्याचे सांगितले.त्यानंतर काही वेळातच पाठीमागून एक गजगा कलरची ब्रिजा कार आली तिचा क्रं.MH 13 DE.6320असा होता त्यातून एक ईसम बाहेर येताच त्यावेळी ट्रक चालक नागेश चव्हाण याने आम्हांस सांगीतले की,हेच सदर ट्रकचे मालक असल्याचे सांगीतले त्यानुसार त्यासही जवळ आल्यानंतर पंचासमक्ष नांव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव व पत्ता राहूल अंकुष भिसे, वय-28 वर्षे,व्यवसाय – शेती,रा. पानगांव ता.बार्शी, सोलापूर असे सांगीतले.त्यास विश्वासात घेवून सदर चोरीचे वाळूबाबत विचारणा करता त्याने ही वरीलप्रमाणे चालक नागेश चव्हाण याचे सांगणेप्रमाणेच माहीती दिली.त्यास वाळु उपसा करणेबाबत शासनाची परवानगी व राँयल्टी बाबत विचारपुस करता त्यानेही परवानगी नसल्याचे सांगितले.त्यानंतर त्यांचे कब्जातून पंचनाम्यात नमूद वर्णनाप्रमाणे चोरीची अवैध वाळू व वाळू काढण्यासाठी वापरण्यात आलेली साधने वाहने जप्त करण्यात आली