October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

वाळु चोरांवर कारवाई करा ;बार्शी तहसीलदार यांना माहिती अधिकार महासंघाचे निवेदन

सोलापूर  ; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

बार्शी तालुक्याचा पदभार स्वीकारलेले नुतन  तहसीलदार सुनील शेरखाने यांना माहिती अधिकार महासंघाचे वतीने निवेदन देऊन वाळु चोरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
    निवेदनात म्हटले आहे की तालुक्यात गत कित्येक महिन्यांपासून वाळू उपसा व वाळू चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.तरी याकडे  आपल्या स्तरावर गांभीर्याने लक्ष देऊन वाळू चोरंवर योग्य ती कारवाई/कार्यवाही करावी आणि पर्यावरणाचा होणारा र्यास थांबवावा.
दुसऱ्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रात सर्वत्र ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार हे विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारा विरोधात कार्य करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात होणारा विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहे. सर्वांच्या जीवास मोठ्या प्रमाणात धोका होत आहे. ते सत्याच्या बाजूने लढत असतात, पण त्यांना कोणाचीच साथ नसते सर्व भ्रष्ट व्यवस्थेतील लोक त्यांचेवर खोटे गुन्हे दाखल करतात, त्यांना बदनाम करतात, कित्येकदा जीवे मारण्याची धमकी दिली जाते, आणि अनेकांचा जीव देखील गेला आहे.

तसेच बार्शीतील माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांना पूर्वीचे असलेले पोलिस संरक्षण तात्काळ नियमित करावे त्यांच्या जीवितास व प्रतिष्ठेस, त्यांच्या मित्रपरिवाराला अनेक बेकायदेशीर अवैध व्यवसाय करणारे, भ्रष्ट राजकीय लोक व भ्रष्ट अधिकारी त्यांच्यापासून धोका आहे तरी तात्काळ शासकीय संरक्षण द्यावे ही विनंती अन्यथा लोकशाही मार्गाने आम्ही न्याय मागू याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

या सर्वांच्या जीवितास धोका असल्याने सर्व व्हिसल ब्लोअर सामाजिक कार्यकर्ते, आर. टी.आय. कार्यकर्ते व पत्रकार यांची कामगिरी तपासून त्यांच्या जीवाला असलेला धोका, त्यांनी दिलेल्या तक्रारी व त्यांचे म्हणणे तपासून आवश्यक त्यांना तात्काळ शासनाच्या वतीने पोलीस संरक्षण द्यावे ही विनंती.
या निवेदनातून केलेली आहे.
यावेळी यावेळी महासंघाचे सोलापूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख दयानंद पिंगळे ,सुहास कांबळे, बालाजी डोईफोडे,आकाश दळवी ,कुलदीप पिंगळे,, ब. .पा. तालुकाध्यक्ष किशोर कांबळे,समाधान चव्हाण,विनोद ननवरे उपस्थित होते.

Leave a Reply