June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

वाकडी जि.प.शाळेत दिडशे विद्यार्थ्यांना स्कुल बॅग वाटप

बार्शी; (गणेश गोडसे )

Advertisement

वृक्ष संवर्धन समिती बार्शी,जाणीव फाऊंडेशन बार्शी व समता फाउंडेशन च्या संस्थापिका रेशमा लेंगरे कारभारी  यांच्यावतीने वाकडी ता.परंडा येथील जि.प. शाळेतील एकशे पन्नास विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.

टाकाऊ पासून टिकाऊ शालेय बॅग वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी कॉलेजचे माजी उपप्राचार्य  शशिकांत धोत्रे हे होते. धनंजय हांडे, काशिनाथ वळेकर, माने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री धोत्रे,रेश्मा लेंगरे कारभारी यांनी मनोगत व्यक्त केले. टाकाऊ पासून टिकाऊ या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला आवर्जून जाणीव फाउंडेशनचे वसंत हवालदार , वृक्ष संवर्धन समितीचे राणा देशमुख, दासभाऊ मस्के, सचिन शिंदे, शशिकांत पोतदार, संपतराव देशमुख, राजाभाऊ नवगन,
आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी वाकडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ गटकळ, सुधीर वाघमारे, उमेश नलावडे, श्री चौरे, दुधाळ, घावटे , देवराम, श्री गलांडे , केमदारने, धोत्रे, पाटील, गंभीर,
आधी शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करळे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक नागनाथ गटकळ यांनी केले .

Leave a Reply