लाच प्रकरणी रस्तापुराचे ग्रामसेवक बाळासाहेब धर्मे जाळ्यात

बार्शी ;
धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी बार्शी तालुक्यातील रस्तापूर येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बाळासाहेब दादाराव धर्मे, वय ५१ ता. बार्शी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने रंगेहात पकडण्यात आले.
याबाबत गावातील ४२ वर्षीय इसमाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
यातील तक्रारदार हे सरपंच असून आलोसे हे सदर गावचे ग्रामसेवक आहेत. तक्रारदार यांनी पदरखर्चाने काही ग्रामविकास कामे केली होती , ग्रामविकास निधीअंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेतून तक्रारदार यांना त्यांचे स्वखर्चाची रक्कम परत मिळणेकरिता संबंधित वस्तू खरेदी केलेल्या दुकानदारास रक्कम मिळणेकरिता चेक काढावे लागतात. त्याकरिता यातील तक्रारदार यांनी चेकवर स्वाक्षरी केलेल्या आहेत परंतु यातील आलोसे यांनी सदर चेकवर स्वाक्षरी करण्याकरिता तक्रारदार यांचेकडे ग्राम विकास निधीच्या एकूण रक्कम ₹ ८,५०,०००/- च्या सुमारे ३ % रक्कम बक्षीस- लाच म्हणून ₹ २६,०००/- ची मागणी केली व तडजोड म्हणून २.१/२ रक्कम ₹ २१,२५०/- सापळा कारवाई दरम्यान स्वीकारली असता यातील आलोसे याना रंगेहात पकडण्यात आले आहे.
सदर. कारवाई पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील,
पोलीस निरीक्षक श्रीमती कविता मुसळे,अर्चना स्वामी, उमेश पवार, स्वप्नील सन्नके यांच्या पथकाने केली.