March 30, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

लक्ष्याचीवाडी येथे चक्क ट्रॅक्टरचा नांगरच लंपास

बार्शी;

घराच्या पश्चिम दिशेला ठेवलेला ट्रॅक्टरचा एक लाख पाच हजार रूपये किंमतीचा हायड्रॉलिक नांगरच चोरट्यानी लंपास केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील लक्ष्याचीवाडी येथे उघडकीस आला आहे.
#संभाजी गवळी वय54 रा.उपळाई रोड,लक्ष्याचीवाडी ता.बार्शी यांनी याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की ते राहत असलेल्या घराच्या पश्चिम दिशेला त्यांनी ट्रॅक्टरचा नांगर सोडला होता.दरम्यान चोरट्यानी दि.4 ते 7 फेब्रुवारीदरम्यान  नांगर लंपास केला.याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply