March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

रोज ग्रिन टि,काॅफी पिल्याने टळु शकतील या आजाराने होणारे मृत्यू,नव्या संशोधनातुन दावा

तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणालाही डायबिटीसचा आाजार असेल तर तुमच्यासाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. एका नवीन रिसर्चमधून तज्ज्ञांनी याबाबत खुलासा केला आहे. डायबिटीसच्या रुग्णाने जर रोज ग्रीन टी किंवा कॉफीचे सेवन योग्य प्रमाणात केले तर या आजारामुळे निर्माण होणारा मृत्यूचा धोका टाळता येऊ शकतो. डायबिटीसवर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर मृत्यू होण्याचाही धोका असतो. म्हणून तज्ज्ञांचे यावर अधिक रिसर्च सुरू आहे. ओन्ली माय हेल्थने दिलेल्या माहितीनुसार डायबिटीसच्या रुग्णांसाठी महत्वपूर्ण असलेले हे संशोधन ऑनलाइन ब्रिटिश मेडिकल जर्नलचे BMJ Open Diabetes Research & Care मध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.

Advertisement

या रिसर्चमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार ४ कप ग्रीन टी प्यायल्याने किंवा २ कपपेक्षा जास्त कॉफी प्यायल्याने डायबिटीसमुळे होणारा मृत्यूचा धोका ६३ टक्क्यांनी कमी होतो. हा रिसर्च जवळपास ५ वर्षांपासून कॉफी आणि ग्रीन टी चे सेवन करत असलेल्या डायबिटीक रुग्णावर करण्यात आला होता. रिसर्चमध्ये याबाबत संदर्भ दिलेले आहेत. ग्रीन टी आणि कॉफीमध्ये बायोएक्टीव्ह कंपाऊंड्स असतात. त्यामुळे शरीराला फायदा होतो. पाच वर्षांपासून हा रिसर्च सुरू होता. टाईप २ डायबिटीजचे शिकार असलेल्या एकूण ४९२३ रुग्णांचा यात समावेश होता.

यात एकूण २७९० पुरूष तर २१३३ महिलांचा समावेश होता. या रुग्णांचे वय जवळपास ६६ च्या आसपास होते. या रुग्णांच्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष देण्यात आले. ग्रीन टी आणि कॉफी पित असलेल्या रुग्णांवर अधिक लक्ष देण्यात आले. याशिवाय तासनतास व्यायाम करणं, एल्कोहोलचे व्यसन, सिगारेट पिण्याची सवय, रात्री व्यवस्थित झोप न होणं सवयींवरही लक्ष देण्यात आले होते.

या अभ्यासात सहभागी असलेले ६०७ लोक असे होते जे ग्रीन टी चे सेवन करत नव्हते. ११४३ लोकांना दिवसातून एकदातरी ग्रीन टी पिण्याची सवय होती. १३८४ रुग्ण २-३ कप ग्रीन टी चे सेवन करत होते. १७८४ लोक दिवसातून ४ पेक्षा जास्तवेळ ग्रीन टीचे सेवन करत होते. ९९४ लोक ग्रीन टी से सेवन करत नव्हते. १३०६ लोक एक कप कॉफी घेत होते. १६६० रुग्ण २ किंवा त्यापेक्षा जास्तवेळा कॉफीचे सेवन करत होते. या रिसर्च दरम्यान ३०९ लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला.

या रुग्णांच्या मृत्यूचे कारण कॅन्सर आणि कार्डीओवॅस्क्यूलर डिसीज होते. वैज्ञानिकांना यात दिसून आलं की, ग्रीन टी आणि कॉफी या दोन्ही पदार्थाचे सेवन केल्यास डायबिटीसमुळे होत असलेला मृत्यूचा धोक कमी होतो. हा एक अवलोकनात्मक (observational study) अभ्यास आहे. याबाबत अधिक संशोधन केलं जाणं आवश्यक आहे.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Leave a Reply