March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

रेड्यांच्या मिरवणुकीवर करोनाचे सावट,बार्शीत हौशी पशुमालकांनी केली दारातच पूजा

सोलापुर;महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

चालुवर्षी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जवळपास सगळीकडे सर्वच  मिरवणुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे यावर्षी हौशी पशु मालकांना ही आपल्या हौसेला मुरड घालावी लागली असल्याचे दिसुन येते.
दिवाळी पाडव्याच्या दिवशी रेड्यांच्या मिरवणुका हा बार्शीकरांसाठी विशेष आकर्षणाचा विषय असतो या दिवशी बहुतांश पशु मालक आपापल्या रेड्यांची आकर्षक सजावट करून हलगी ताशांच्या गजरात मिरवणूक तसेच म्हशी पळण्याची दीर्घ अशी परंपरा आहे   आणि या मिरवणुका बघण्यासाठी बार्शीकर नागरिकांची सोमवार पेठ पांडे चौक या ठिकाणी मोठी गर्दी असते मात्र या वर्षी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व मिरवणुकीच्या परवानगी नाकारण्यात आल्या होत्या तरीही काही दादा मारकड सारख्या हौशी पशु मालकांनी घरी दारातच रेड्यांची सजावट करून हगली ताशांच्या गजरात पूजा केली यावेळी महालक्ष्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आण्णा पेठकर,विकास अलदर, पिंटू घोलप, उमेश पवार, दिनेश मस्के, हेमंत बाबर, सामाजिक कार्यकर्ते गणेश गाढवे ,तुळशीदास मस्के, हरिभाऊ खांडेकर, पप्पू मस्के ,आकाश लाकाळ आदी उपस्थित होते

Leave a Reply