June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

राष्ट्रवादी काँग्रेस बार्शीची आढावा बैठक संपन्न

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बार्शी शहर व तालुका कार्यकारिणीची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सावळे आण्णा सभागृहात  पार पडली.

यावेळी जिल्हाध्यक्ष बळीराम  साठे यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबूत करण्याचा आणि पक्ष विचार घरोघरी पोचवण्यासाठी मतभेद विसरून एकजुटीने काम करण्याचा सल्ला दिला.राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी  दिला

राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर, जिल्हा सरचिटणीस अॅड. विक्रम सावळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.शहराध्यक्ष अमोल आंधळकर यांनी पक्षाचा कार्य अहवाल सादर केला.

यावेळी महिला उपाध्यक्षा सुवर्णा शिवपुरे, जिल्हा उपाध्यक्ष मौलाना कादरी, तालुका अध्यक्ष राजकुमार पोळ, महिला तालुका अध्यक्ष सुप्रिया गुंड, तालुका उपाध्यक्ष अच्युत पवार, भारत देशमुख यांनी विचार व्यक्त केले.

युवक क्राॅग्रेसचे उपाध्यक्ष मंगेश चव्हाण, तालुका कार्याध्यक्ष जयंत देशमुख, शहर उपाध्यक्ष सुनील कात्रे, पदवीधर अध्यक्ष विक्रांत पाटील, आतिष गायकवाड, अल्पसंख्याक अध्यक्ष असिफ शेख, शहानवाज शेख , पांडुरंग जगदाळे आदींनी परिश्रम घेतले. 

याप्रसंगी मेडिकल सेलचे प्रदेश संघटक डॉ आबीद पटेल, लीगल सेलचा  अध्यक्ष हर्षवर्धन बोधले, शेंद्रीचे उपसरपंच महेश चव्हाण, ग्रंथालय सेल अध्यक्ष सुरेश यादव, युवक सरचिटणीस राजशेखर गुंड, विद्यार्थी अध्यक्ष रत्नदीप कुलकर्णी, सागर गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply