March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आनखी एका नव्या नेत्याचे आगमण

धुळे | राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांच्या नेतृत्वात धुळ्यातील एका मोठ्या नेत्याने राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाकर बुधा पाटील यांनी पक्षप्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आणि धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांच्या पुढाकाराने धुळे जिल्ह्यातील प्रभाकर बुधा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्ष बळकटीसाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरेल, असा विश्वास यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, धुळे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, प्रदेश चिटणीस सुरेश सोनावणे तसेच इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply