October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

राणे यांच्या वर उद्धव ठाकरे यांचा निशाना,म्हणाले एक बेडुक आणि त्याची दोन पोर

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते नारायण राणे शिवसेना व महाराष्ट्र सरकारवर टीका करताना दिसत आहेत. अशातच आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना जोरदार प्रतिउत्तर दिलं. दसरा मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी राणेंचा उल्लेख बेडूक असा केला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी, ”प्रत्येक दसरा मेळाव्याला काय बोलणार असं विचारलं जातं. पण, टार्गेट करण्यासाठी नाही. पण, सध्या करोना जोरात आहे. बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत. काही जणांना इंजेक्शन द्यावं लागतं. काही जणांना तर माणसाचं नाही, तर गुरांचं इंजेक्शन द्यावं लागतं. काही जण तर अशी बेडक आहेत.

तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितलं. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही,’ अशा शब्दांमध्ये राणे व त्यांच्या पुत्रांना सुनावले.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात होत आहे. त्यामुळे दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कात करण्याची परंपरा यंदा खंडित झाली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून फक्त 50 जणांच्या उपस्थितीत हा मेळावा होत आहे.

Leave a Reply