June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

राज्यात कोरोणाच्या दुस-या लाटेची सुरूवात?

पुणे :

एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना आणि बाधितांचा दर 20 टक्क्यांपुढे गेला असतानाही केंद्र व राज्य सरकारही अद्याप दुसरी लाट नसल्याचा निर्वाळा देते. मात्र रुग्णवाढीचा चढता आलेख पाहता ही दुसरी लाट असल्याचे खासगी क्षेत्रातील डॉक्टर व तज्ज्ञांचे मत आहे.

पुणे शहरात 8 फेब—ुवारीला 162 नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर सातत्याने रुग्णवाढ होत राहिली. दहा फेब—ुवारीला रुग्णसंख्या 239 झाली. 12 फेब—ुवारीला 258 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर बरोबर एक महिन्यात 12 मार्चला 1804 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.

म्हणजेच एका महिन्यात ही संख्या सहा ते सात पटींनी वाढलेली आहे. गेल्या महिन्यात 14 फेब—ुवारीला ती 354 तर 18 फेब—ुवारीला 465 अशी सातत्याने रुग्णवाढ होत आहे. तरीही ती दुसरी लाट असल्याचा दुजोरा देण्यास शासकीय अधिकारी तयार नसले तरी खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ ही दुसर्‍या लाटेची सुरुवात असल्याचे सांगतात.

रुग्णांचे टेस्टिंग वाढतेय म्हणून रुग्णसंख्या वाढतेय. ज्यावेळी 15 टक्क्यांपेक्षा जास्त बाधितांचा दर असेल तर त्या ठिकाणी लॉकडाऊनऐवजी मायक्रो कंटेन्मेंट झोन करावे लागतात. सध्या तो ठराविक ठिकाणी, सोसायट्यांमध्ये आढळत आहे. अजून दुसरी लाट वाटत नाही.
डॉ. शशांक जोशी,
कोव्हिड टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य

सध्या रुग्णवाढ झपाट्याने होत आहे. रुग्णवाढीचा हा वेग पाहता ही दुसर्‍या लाटेची सुरुवात असल्याचे म्हणायला काही हरकत नाही. संसर्गजन्य आजारांमध्ये ही कमी व जास्त वाढ होत असते. एप्रिल महिन्यापासून ही संख्या कमी होईल, अशी शक्यता आहे.
डॉ. हिमांशू पोफळे,
फुप्फुसविकार तज्ज्ञ, पुणे

Leave a Reply