रणजितसिंह डिसले गुरुजीवर पोस्टाचे तिकीट जारी.. माय स्टॅम्प योजना – अमित देशमुख यांची माहिती

सोलापूर;-महाराष्ट्र स्पीड न्युज
सोलापूर विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर सूर्यकांत पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली डाक विभागाच्या माय स्टॅम्प योजने अंतर्गत, सात कोटी रुपयांचे ग्लोबल पुरस्कार विजेते रणजीतसिंह डिसले गुरुजी यांच्यावर पोस्टाचे तिकीट जारी करण्यात आले.
या तिकिटाचे वितरण सोलापूर विभागाचे स. अधीक्षक मुख्यालय गोविंद दातार, बार्शी उपविभागाचे उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांचे हस्ते ग्लोबल पुरस्कार विजेते रणजीतसिंह डिसले गुरुजी यांना करण्यात आले.
यावेळी तिकीट संग्राहक उदयकुमार पोतदार, सोलापूर येथील पोस्टल सायकल क्लबचे अनंत होंडरे, अमर कुलकर्णी, बार्शी येथील पोस्टमास्तर उल्हास सुतार, महेश तोष्णीवाल, पंजाबराव कराड, राजाभाऊ मोरे, प्रकाश काकडे आदी उपस्थित होते.