February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

येत्या दोन दिवसांत या भागात पावसाची शक्यता…वाचा कुठे…

चालु एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानातील वाढ नोंद होत असतांनाच आगामी दोन दिवसांमध्ये मराठवाडा विभागातील विविध भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने व्यक्त केलेला आहे. तसेच बुधवारी (दि.७) जिल्ह्याचे तापमान ४०.७ अंश असल्याची माहितीही देण्यात आलेली आहे.

या बाबत विभागाच्या वतीने बुधवारी (दि.७) दुपारी हवामान सूचना जारी करण्यात आली. यात प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागातील नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी (दि.९) तुरळक ठिकाणी वादळीवारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
शनिवारी (दि.१०) हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. रविवारी (दि.११) नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, जालना व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह व पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.

मराठवाडा विभागात पुढील दोन दिवसांत पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असा सल्ला ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाच्या वतीने दिला आहे.

Leave a Reply