October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मोहोळ मध्ये कंटेनर व ट्रक अपघात, मोठी आर्थिक हाणी

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज
        मोहोळ शहरातील कुरुल रस्त्यावरील हॉटेल वैष्णवी जवळ केमिकल टँकर व मालवाहतूक करणा-या गाडीची समोरासमोर भीषण धडक होवून झालेल्या अपघात दोन्ही वाहने जळून अक्षरशः खाक झाली 

Advertisement
सदरची घटना आज २२ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली .
   दरम्यान  या झालेल्या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही . घटनास्थळी पोलिस निरीक्षक अशोक सायकर , पोलिस – निलेश देशमुख आदी कर्मचाऱ्यांनी तात्काळ भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली .
आग विझवण्यासाठी अनगरच्या लोकनेते साखर कारखान्याचे अग्निशामक दल घटनास्थळी पोहचले होते .केमिकल टॅकरमधील चालकास शरद गाढवे , महादेव गाढवे , रूषीकेश माने , हॉटेल वैष्णवीचे मालक – शंकर मुसळे आदींनी तात्काळ मदत करून चालकाचा जीव वाचविला . सुमारे तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली होती. या दुर्घटनेमुळे विजापुर महामार्गावर गाड्याच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असल्याचे दिसुन येत होते.

Leave a Reply