March 30, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मोटारकार झाडावर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू, तर चौघे गंभीर जखमी

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

बार्शी – सोलापूर मार्गावर वैराग शहरापासून साधारणपणे ३ कि.मी. अंतरावरील साई इंजिनिअरींग कॉलेजच्या जवळ कार झाडावर आदळून एक जन जागीच ठार , तर चौघे जण गंभीर जखमी झाले . हा अपघात मंगळवार २७ रोजी सायंकाळी पाच वाजणेच्या सुमारास घडला आहे.
या अपघातात मयूर बापू कांबळे ( वय २३ ) रा.बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. तर आदित्य सुरेश कांबळे ( वय २१ ) रा. बीबीदारफळ, वाहन मालक – ईश्वर तम्मा संगेकर ( वय २३ ), चालक – शैलेश देवकर ( वय २२ ) जु
गल जानू कदम ( २५ ) तिघे रा. वैराग ( ता. बार्शी ) असे जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. जखमींना उपचाराठी बार्शी, सोलापूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बीबीदारफळ ( ता. उत्तर सोलापूर ) येथील मयुर कांबळे व आदित्य कांबळे हे दोघे वैराग येथे दुचाकीवरून कामानिमित्त आले होते. तिथे त्यांचे नियोजन बदलले. त्यांनी दुचाकी तिथेच ठेवून वैराग येथील मित्रासह मोटार कार क्रमांक – एम.एच. 13 डी.एम. O473 ही घेऊन वैरागच्या तीन मित्रा समवेत संगेकर यांच्या पाण्याच्या प्लांट असलेल्या सोलापुर रोडकडे निघाले होते. वैराग पासून काही अंतरावर बंद असणाऱ्या कॅनव्हास फॅक्टरी जवळ गाडी आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या कडेला डाव्या बाजूला जाऊन झाडावर आदळल्याने अपघात झाल्याचे बोलले जाते .अपघात इतका भीषण होता की त्यात एक जण जागीच ठार झाला तर चौघेजण जखमी झाले आहेत.

Leave a Reply