March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मोक्‍का प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर उर्फ बप्पा लावंड याला बार्शी येथील विशेष न्यायाधीश यांनी जामीन केला मंजूर

बार्शी;-महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

मोक्‍का प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर उर्फ बप्पा लावंड याला बार्शी येथील विशेष न्यायधीश यांनी जामीन मंजूर केला आहे.
याबाबत अधिक माहिती की बार्शी स्थित डॉ नंदकुमार स्वामी हे दिनांक 9/7 /2018 रोजी मंगळवार पेठ बार्शी येथे दुचाकी वरून जात असताना त्यांच्या गाडीला एक इंडिका कार आडवी आली होती व त्यातून आरोपी रंजना वनवे आणि बप्पा  लावंड तसेच आणखी एक अनोळखी व्यक्ती त्या कार मधून उतरून डॉ स्वामी यांना मारहाण केली होती तसेच त्यांना बळजबरीने गाडीत बसवून इंद्रेश्र्वर साखर कारखान्याकडे घेऊन गेले होते तसेच त्या ठिकाणी देखील इतर दोन व्यक्तींनी तेथे येऊन डॉ स्वामी यांना मारहाण करून त्यांना 10 लाखाची खंडणी मागितली होती.
त्यानंतर दि 10 /7/ 18 रोजी डॉ स्वामी यांनी सदरील आरोपी विरोधात खंडणी आणि अपहरणाची फिर्याद दिली होती परंतु सदरील आरोपी विरोधात आधीचे गुन्हे दाखल असल्याने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्ाअंतर्गत (मोका )कार्यवाही करण्यात आली होती आणि सदर प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक पंढरपूर यांच्या कडे वर्ग करण्यात आला होता.
सदरील प्रकरणी आरोपीच्या वतीने ॲड सचिन झालटे यां च्या वतीने युक्तिवाद करण्यात आला की सदर प्रकरणी फिर्यात उशिरा दाखल करण्यात आली असून त्यामध्ये फिर्यादी यांचा  पुरवणी जबाब देखील उशिरा नोंदवला गेला आहे तसेच सदरील आरोपी हा टोळीचा मुख्य सूत्रधार नसून इतर आरोपी सोबत आधीच्या गुन्ह्यात  सह आरोपी नाही तसेच या आरोपी कडून खंडणीची रककम हस्तगत करण्यात आलेली नाही तसेच इतर आरोपींना देखील मुंबई उच्च न्यायालयात जमीन मंजूर झाला आहे.
वरील युक्तिवाद मान्य करून मा विशेष मोका न्यायालय बार्शी आर एस पाटील साहेब यांनी 50 हजाराच्या जामिनावर आरोपीची सुटका करण्याचे आदेश दि 23 /11/20 रोजी दिले
आरोपीच्या वतीने ॲड सचिन झालटे यांनी काम पाहिले तसेच त्यांना ॲड अमित यादव आणि ॲड महेश चव्हाण यांनी सहकार्य केले.

Leave a Reply