June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मोक्षधामला जाण्याची वेळ येवू नये म्हणून कार्डियॅक – सोपल प्रसन्नदाता मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून कार्डिअॅक अॅम्ब्यूलन्सचे लोकार्पण

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शीतील कुंकूलोळ हे दानशूर घराणे म्हणून ओळखले जाते, आर्थिक संकटातील शाळेला मोठी आर्थिक मदत केल्याने त्यांचे नाव पूर्वी एका शाळेला देण्यात आले होते. त्यांनी मोक्षधामला मदत केली, ते  जाण्याची सोय व्हावी म्हणूनही मोक्षरथासाठी मदत केली. परंतु आता मोक्षधामला जाण्याची वेळच कोणावर येवू नये म्हणून त्यांनी कािर्डयॅक दिली आहे. या मदतीमुळे लोकांना खरोखरीच आधार मिळाला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री अॅड.दिलीप सोपल यांनी व्यक्त केले.
कुंकूलोळ परिवाराच्या वतीने प्रसन्नदाता मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून रूग्णांच्या सोयीसाठी कार्डिअॅक अॅम्ब्यूलन्सची भेट देवून त्याचे दिलीप सोपल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ धन्वंतरी डॉ.बी.वाय.यादव, अनिल बंडेवार, नगरपरिषदेचे विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोटे, अशोक कुंकूलोळ, शिवसेनेचे शहराध्यक्ष दिपक आंधळकर, ट्रस्टचे अध्यक्ष कमलेश मेहता, पारस कांकरिया आदी उपस्थित होते.
सोपल म्हणाले, बार्शीत लवकरच ट्रामा सेंटरची अद्ययावत सोय उपलब्ध होईल त्यासाठी या अॅम्ब्युलन्सचा चांगला उपयोग होइल. मोक्षधाम इतकी सजवलेली स्मशानभूमी दुसरीकडे कुठेही पहायला मिळत नाही. एखाद्या प्रसंगासाठी स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर तेथे पािहल्यास स्मशान वैराग्य येतं, कारण तिथलं वातावरणच तसं असते, तथे गेल्यावर आता आपल्यातरी आयुष्यात काय राहिलेलं आहे, कशासाठी आपण हे एवढं सगळं मुलाबाळासाठी नातवंडा परतंडासाठी करतो अशी भावना तिथं गेल्यावर, पारंपारीक स्मशानभूमीत गेल्यावर होइल. पण नगरपालिकेने प्रस्ताव दिल्यानंतर ट्रस्टने महाराष्ट्रातील एक उत्कष्ट स्मशानभूमी असे रुपच पालटून टाकले, अन ही स्मशानभूमी नाही, इथे स्मशानवैराग्य वगैरे काही नाही तर अापण एखाद्या पिकनीक स्पॉटला आलो आहे की काय अशी भावना निर्माण होते. येथे येणाऱ्याचे आणि नातेवाईकांचे असे सगळ्यांचेच दु:ख हलके करण्याचे काम या सगळ्या वातावरणाने होते. इथं विद्युतदाहिनीचा प्लॅन कॅन्सल करून गॅसदाहिनीचा प्रकल्प राबविला कारण इथल्या विजेचा लपंडाव पाहता मेल्यावरसुध्दा एखाद्यावर अन्याय नको म्हणून काळजी घेण्यात आली आहे. प्रचंड चांगली कामे प्रसन्नदाता ट्रस्टने केली आहेत. श्री गणेशाची, बजरंगबलीची स्थापना, गणेशाची पालखीतून मिरवणूक, तरुण तरुणींचा सहभाग, मुलींचे बँडचे पथक असे चांगले उपक्रम राबवून नेहमी पुढे राहण्याचे काम या मंडळाने केला असून, वैद्यकिय वा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असो प्रसन्नदाता गणेश मंडळ हे लोकांच्या विश्वासाचा केंद्रबिंदू झालेला आहे.
डॉ.बी.वाय यादव म्हणाले, मागील ४५ वर्षांच्या वैद्यकिय क्षेत्रातील प्रसंगाचे माझ्यासह कै.डॉ.कश्यपी, कै.डाॅ.नेने, कै.डॉ.हिरेमठ साहेब आदी साक्षीदार आहेत. कित्येक जणांचे मृत्यू हे केवळ उपचारासाठी वेळेत पोहोचता आले नाही, अॅम्ब्युलन्स सारख्या जलद सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक जीव गेले आहे. आता काही रुग्णालयांत अॅम्ब्युलन्सची सोय आहे. रुग्ण वाचण्यासाठी चांगली अॅम्ब्युलन्स आणि ट्रॉमा सेंटरची सोय असेल तर अपघातील मृत्यूचे प्रमाण निम्म्यावर येणे शक्य आहे. बार्शीसारख्या ठिकाणी आणखी किमान दहा अॅम्ब्युलन्सची गरज आहे. बार्शीहून कोणताही रुग्ण बाहेर जाणार नाही यासाठी बार्शीतील वैद्यकिय क्षेत्र प्रयत्न करत आहे.

Leave a Reply