June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मोक्का मधील आरोपींचा जामिन विशेष मोक्का न्यायालय बार्शी यांनी फेटाळला

सोलापूर;- महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

टेंभूर्णी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक
कायदा कलम ३(१)(ii), ३(२),३(४) प्रमाणे दि. ७/१२/१९ रोजी दाखल झाला होता. सदर गुन्हयातील अटक आरोपी  शितल उर्फ चिवळी कुबेर उर्फ कुब-या काळे वय ३० वर्षे रा साडे ता करमाळा व  मल्हारी बाळासाहेब
पालवे वय १९ रा मलवडी ता करमाळा यांनी विशेष जिल्हा न्यायालय बार्शी येथे जामिन साठी अर्ज दाखल केला होता.मात्र मोक्का मधील आरोपींचा जामिन विशेष मोक्का न्यायालय बार्शी यांनी फेटाळला आहे.
सदर गुन्हयाची हकिकत अशी की, ९ आरोपींची संघटित गुन्हे करणारी टोळी असून लोकांना लग्नासाठी बोलावून
त्यांच्याकडून मुद्देमाल ची जबरी चोरी करून त्यांना मारहाण करून खुन करणे अश्या प्रकारचे गुन्हे केले जात होते.सदर टोळी प्रमुख व सदस्यांनी दिनांक ७/१२/२०१९ रोजी फिर्यादी व मयत अहमद शेख या दोघांना कुर्डूवाडी येथून दुचाकीवर लग्नासाठी बोलावून घेवून भागाईवाडी येथे घेवून
जात असताना आरोपी यांनी इतर साथीदाराच्या मदतीने फिर्यादी व अहमद शेख यांचेवर हल्ला करून आरोपी व त्याचे साथिदार यांनी १,४८,०००/- रू मुद्देमालाची चोरी करून अहमद शेख याचा खुन केला. मल्हारी पालवे, शितल काळे व त्यांच्या इतर साथिदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. व सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज यांचेकडे देण्यात आला. सदर तपासादरम्यान वरील आरोपींना साक्षीदारांने ओळख परेड दरम्यान ओळखले. तसेच आरोपींकडून गुन्हयात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. सदर आरोपीविरूध्द गुन्हयात मोक्का अंतर्गत दोषारोप पाठविण्यात आले. यातील आरोपींनी बार्शी येथील विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. सदर आरोपीच्या वतिने युक्तीवाद करण्यात आला की, आरोपीचा सदर गुन्हयात कुठलाही सहभाग नाही आरोपी हा केवळ आरोपी नं १ राजू काळे याचे सांगण्यावरून फिर्यादी यास कुडूवाडी येथे आण्यास गेला होता.आरोपीस इतर आरोपींच्या हेतूबाबत कोणतीही कल्पना नव्हती. आरोपी विरूध्द तपास पूर्ण झालेला आहे. त्यामुळे जामिन देण्यात यावा अशी विनंती आरोपीचे वतिने करण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड दिनेश देशमुख यांनी युक्तीवाद केला की, आरोपींचा सदर गुन्हयात प्रत्यक्ष सहभाग आहे. आरोपी गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला व सदर घटनेची कल्पना कोणालाही दिली नाही. यावरून असे दिसून येते की त्याचा प्रत्यक्ष सहभाग आहे. तसेच आरोपीविरूध्द यापूर्वी कोणतेही गुन्हे नसले तरीही मोक्का कायदयाचा तरतुदीचा विचार करीता सदर कायदयाच्या दृष्टीने अशा होणा-या घटनाना प्रतिबंध होणे आवश्यक आहे. आरोपींना अशा गंभीर गुन्हयामध्ये जामिन देता येवू शकत नाही. आरोपीविरूध्द असणारा पूरावा याचा विचार करीता बार्शी येथील विशेष न्यायाधिश  आर.एस पाटील यांनी आरोपींचा जामिन अर्ज नामंजुर केला आहे. टेंभूर्णी पोलीस ठाणेचे पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ अमृत खेडकर यांनी काम पाहीले.

Leave a Reply