मुलांना लहानपणापासून चांगल्या वाईटाची ओळख करून द्या; किर्तनकार कु.शिवलिला पाटील

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज
अलिकडील काळात संस्कार कमी होत चालले आहेत.झाडाची फांदी जोपर्यंत कोवळी असते तोपर्यंतच ती वाकते.त्यामुळे मुलांवर लहान वयातच संस्कार करूण त्यांना चांगल्या वाईटाची ओळख करून द्या तरच भविष्यात मुले यशस्वी होतील असे किर्तनकार कु.शिवलिलाताई पाटील यांनी उपस्थितीतांना आपल्या किर्तन कार्यक्रमांमधून सांगितले.
त्या बार्शीतील साई डेव्हलपर्स यांच्या वतीने शहरातील परंडा रोड भागातील साई मधुरा नगर,धर्माधिकारी प्लाॅट येथे आयोजित किर्तन व महाप्रसादाचे वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.या कार्यक्रमाचे आयोजन साई डेव्हलपर्सचे मालक उद्योजक सतिश अंधारे यांनी केले होते.
कु.पाटील यांनी दोन ते अडीच तास उपस्थित भक्तगणांना संबोधीत केले.प्रेम आवर्जुन करा पण प्रेम कुणावर करावे याचा विचार मात्र अगोदर करा असा मंत्रही त्यांनी दिला.किर्तना नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.उपस्थित हजारो भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला.
यावेळी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले,दिगंबर चिंतामन,लहु नवले,कथले मालक,मुरकुटे महाराज,मुन्ना शेटे,गजानन चेट्टी,भारत विधाते,विजय घोलप,सुरज कोकाटे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रम यश्स्वी करण्यासाठी संयोजक सतिश अंधारे यांच्यासह साई डेव्हलपर्सच्या टिमने परिश्रम घेतले.