मुख्याध्यापिका सौ.सत्यभामा प्रताप चव्हाण यांचा कोरोणा रणरागिणी सन्मान

सोलापूर: महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी येथील श्रीमान शिवाजीराव गुंड आदर्श प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.सत्यभामा प्रताप चव्हाण यांना कोरोणा काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मोहोळ येथील सौ.सरस्वती लक्ष्मण काळे शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कै.नागनाथ काळे यांच्या स्मरणार्थ कोरोणा 19 रणरागिणी हा सन्मान देऊन गौरविण्यात आले.आ.प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सौ.गुंड यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी लाच लुचपत विभागाच्या कविता मुसळे आदी उपस्थित होते.कोरोणा योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डाॅ. प्रकाश गुंड आदींनी चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे.