October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मिरज-लातुर दरम्यान विद्युतीकरण काम गतीने

सोलापूर ;

सोलापूर विभागातील विद्युतीकरणाचे काम सध्या ९० टक्के पूर्ण होत आले आहे. दौंड सोलापूर, भिगवण – मोहोळ, वाडी ते दुधनी या वेगाने झालेल्या विद्युतीकरणाच्या कामानंतर आता मिरज – लातूरच्या विद्युतीकरणाच्या कामाने ही वेग धरला आहे. मिरज – सांगोला – पंढरपूर कुर्डुवाडी आणि आता बार्शीच्या पांगरीपर्यंत हे काम पूर्ण झाले आहे. सध्या मिरज ते कुर्डुवाडी अन कुर्डुवाडी ते ढालगाव हे १८७ किलोमीटरपर्यंत जे काम झाले. हे त्याचे परीक्षण राष्ट्रीय सुरक्षा आयुक्तांकडून करण्यात आले आहे. शिवाय याला हिरवा कंदीलही मिळाला आहे. या शिवाय आता ते काम बार्शीच्याही पुढे सरकले आहे. उस्मानाबाद कळंब रोड, येडशी,ढोकी, तेर, पलसप, मुरुड, हरंगुल, आणि लातूर रोड ही केवळ मोजकी गाव राहिली असून या गावातून हे विद्युतीकरण होणार आहे .

मिरज – लातूर विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे . येत्या काही महिन्यांत हे काम लातूर पर्यंत पोहोचेल असे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी सांगितले.

Leave a Reply