October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मिथुन चक्रवर्तीचा मुलगा आणि पत्नी विरोधात एफआयआर दाखल,बलात्कार आणि जबरदस्ती गर्भपाताचा आरोप

मुंबई- बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्ती अडचणीत सापडला आहे. त्याच्या विरोधात मुंबईच्या ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार आणि गर्भपात करायला लावल्याची केस दाखल केली गेली आह. या प्रकरणात मिथुन चक्रवर्ती यांची पत्नी योगिता बाली यांच्यावरही आरोप केले गेले आहेत. हे आरोप सिने इंडस्ट्रीमध्ये काम करणा-या एका अभिनेत्री-मॉडेलने लावले आहेत.

Advertisement

मिडिया रिपोर्ट्सनुसार, पिडीत अभिनेत्रीने एफआयआरमध्ये सांगितलंय की ‘ती आणि महाअक्षय २०१५ मध्ये रिलेशनशिपमध्ये होते.

२०१५ मध्ये महाक्षयने पिडित अभिनेत्रीला घरी बोलवलं आणि तिच्या सॉफ्ट ड्रिंकमध्ये नशेचं औषध मिसळलं. या दरम्यान महाक्षयने पिडित अभिनेत्रीच्या सहमतीशिवाय तिच्यासोबत शारिरिक संबंध ठेवले आणि नंतर कित्येकदा लग्न करण्याच्या गोष्टी केल्या. महाक्षयने लग्नाचं वचन देऊन कित्येकदा तिच्यासोबत शारिरिक संबंध ठेवले.’

महाक्षयवर असा आरोप आहे की त्यानंतर जवळपास चार वर्ष तो पिडित अभिनेत्रीसोबत शारिरिक संबंध ठेवत होता. सोबतंच तिचा मानसिक छळ देखील केला. एफआयआरनुसार, ‘जेव्हा पिडित अभिनेत्री गरोदर राहिली तेव्हा महाक्षयने तिला जबरदस्ती गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. जेव्हा तिने गर्भपात करण्यास नकार दिला तेव्हा तिला गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला.

पिडित अभिनेत्रीचं म्हणणं आहे की तिला दिल्या जाणा-या गोळ्या या गर्भपाताच्या आहेत हे तिला माहित नव्हतं. या पिडित अभिनेत्रीने महाक्षयची आई आणि मिथुन चक्रवर्तीची पत्नी योगिता बालीवर तक्रार केल्यानंतर धमकवल्याचा आणि प्रकरण दाबुन टाकण्यासाठी दबाव टाकल्याचा देखील आरोप आहे.

महाक्षय आणि योगिता बाली विरोधात ३७६(२) (एन) (एकाच महिलेवर सतत बलात्कार करणं), ३२८ ( विष किंवा इतर कोणत्याही माध्यमातून तिचं नुकसान करणं) ४१७ (धोका), ५०६(धमकावणं), ३१३ (महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात) आणि कलम ३४ अंतर्गत केस दाखल केली आहे.

Leave a Reply