June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मित्र विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा


बार्शी ;
मळेगाव ता.बार्शी येथील कर्मवीर ना.मा.गडसिंग गुरुजी मित्र विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सौ.हेमांगी मिरगणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्राचार्य विकास बोराडे,संचालक विलास मिरगणे पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा प्रभाकर गव्हाणे,गौस शेख,चंद्रकांत पाटील उपस्थित होते.संचालक विलास मिरगणे यांच्या हस्ते कर्तृत्ववान व आदर्श शिक्षिका हेमांगी मिरगणे व देशाचं उज्वल भविष्य म्हणून ओळख असणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा सत्कार यावेळी करण्यात आला.हेमांगी मिरगणे यांनी समाजात अनंत रूपांत असामान्य कर्तृत्व दाखविणाऱ्या स्त्री शक्तीचा गौरव करीत विविध उदाहरणाद्वारे त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला.यावेळी संभाजी जाधव,गुलाब शेख,आण्णासाहेब काशीद,उमेश क्षीरसागर, मुकुंद डोईफोडे,दशरथ ननवरे,विजय वाघमारे,भगवान काळे,
राजेंद्र बागुल,विजय मम्हाणे,निलेश केदार,विकास राऊत,अनिल भोसले,श्रीमंत वाघमोडे,सुहास बुरगुटे,वैभव वाघमारे,राजकुमार आपुणे तसेच इयत्ता दहावी व बारावीचे विद्यार्थी उपस्थित उपस्थित होते.सूत्र संचालन व आभार शंकर आगलावे यांनी मानले..

Leave a Reply