February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मालवंडीत तिघांना मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल


सोलापूर ;
जनावरे पिकात येऊ देऊ नका असे म्हटल्याच्या किरकोळ कारणावरून चौघांनी मिळुन तिघांना काठीने बेदम मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील मालवंडी येथे घडला.
#शिवाजी औदुबर होनमाने,औंदुबर जालिंदर होनमाने , रवी चंद्रकांत थोरात व सगुणा औदुंबर
होनमाने सर्व रा. मालवंडी ता. बार्शी अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

#सौ.किसनाबाई विष्णु होनमाने बय-40 वर्षे , गोविंद लक्ष्मण पांढरे व अंजन आप्पा गोविंद पांढरे सर्व रा.मालवंडी ता.बार्शी अशी जखमींची नावे आहेत.
#जखमी किसनाबाई होनमाने यांनी सुविधा हॉस्पिटल बार्शी येथुन दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांनी जनावरे पिकात येवु देवु नका असे सांगितल्याचे कारणावरून हातात काठ्या घेवुन घरासमोर येवुन घाण घाण
शिविगाळ करून सगुणा औंदुबर होनमाने हीने तुला लई मस्ती आली का असे म्हणून केस धरून खाली
पाडले व शिवाजी औंदुबर होनमाने यांनी फिर्यादीचे उजव्या हाताचे पोटरीवर, दोन्ही मांड्यावर, कंबरेवर
व बरडगडीवर काट्याने मारून फिर्यादीचे उजव्या हाताचे पोटरीचे हाड मोडले आहे .तसेच फिर्यादीचे
वडील गोविंद लक्ष्मण पांढरे व फिर्यादीचा भाऊ अंजन अप्पा गोविंद पांढरे हे भांडन सोडविण्यासाठी मध्ये
आले असता त्याना ही शिविगाळ करून शिवाजी औंदुबर होनमाने याने फिर्यादीचे वडीलाचे डाव्या हातावर
काठीने मारून जखमी केले तसेच रवी चंद्रकांत थोरात याने फिर्यादीचे भावाचे डाव्या हातावर’, डाव्या
पायावर त्याच्या हातातील काठीने मारून जखमी केले तसेच औंदुबर जालिंदर होनमाने याने त्याच्या
हातातील काठीने फिर्यादीचे पाटीवर, मांडीवर मारून जखमी केले तसेच त्यांनी मोठमोठ्यानी शिविगाळ
आरडा-ओरड करून पुन्हा तु नादाला लागली तर जिवच मारतो अशी धमकी देवुन निघुन गेले.
याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हवालदार रियाज शेख हे करत आहेत.

Leave a Reply