माणुसकी ची शिकवणं समाजात रुजवण्यासाठी श्यामची आई काळाची गरज – कांचन जाधवर

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी तालुक्यातील वालवड शंभु महादेव ज्ञानप्रबोधिनी अकॅडमी वालवड व वृंदावन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील सर्व शालेय मुलांना दिवाळीच्या निमित्ताने मातृप्रेमाच महामंगल स्त्रोत असलेल्या ” श्यामची आई ” या साने गुरुजी यांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या . समाजातील वाढता विद्वेश अन हेवेदावे हे सोडून आज बंधूभाव जपनारया माणुसकीच्या मूल्यांची पुन्हां एकदा पेरणी होने गरजेचे आहे , संस्कारमुल्यांची शिकवणं रुजवण्यासाठी साने गुरुजींच्या श्यामच्या आई ची आज पुन्हां एकदा गरज असल्याचे प्रतिपादन कांचन जाधवर यांनी केले.
साने गुरुजी लहान असताना ची एक कथा…. अंघोळ झाली आई ने श्याम चे अंग पुसून काढले, आणि घरात निघून आली… श्याम ने आई ला हाक मारली,आग आई मला कडेवर घेऊन जा माझ्या पायाला घाण लागेल…. तेव्हा श्यामची आई म्हणते, आरे श्याम तु जसं पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस ना! तसं तुझ्या मनाला घाण लागू नये म्हणून जप. कृतीशील विचार मुल्यांना अधिष्ठान मानुन जगनारी पिढी घडविण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीने कार्यरत राहावे असा आशावाद पुढें बोलतांना त्यांनी व्यक्त करत पुज्य सानेगुरुजी यांच्या जीवनातील ही घटना सांगुन त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले .
याप्रसंगी प्रबोधिनीच्या संचालिका मनीषा जाधवर दराडे , कामगार नेते मुकुंद जाधवर , सामाजिक कार्यकर्ते अशोकराव जाधवर प्रा संतोष जाधवर , हनुमंत जाधवर गुरुजी , डॉ. रणजित जाधवर , डॉ.तृप्ती जाधवर इ मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे निवेदन प्रा धनाजी भालेराव यांनी केले .