October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

माढा येथील सना मोमीन हत्तेप्रकरणी सासु-सासरे यांना जामीन मंजुर

सोलापूर;-महाराष्ट्र स्पीड न्युज
माढा येथील सना इरफान मोमीन या विवाहितेच्या खुन प्रकरणी अटकेत
असलेले सासु-सासरे असिया रज्जाक मोमीन व रज्जाक मकबुल मोमीन यांना बार्शी
येथील अति- जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एस.पाटील  यांनी पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला.
यात हकीगत अशी की, मयत सना हिचा विवाह आरोपी इरफान रज्जाक
मोमीन यांच्याशी २०१३ साली झाला होता. लग्नाचवेळी सना हिच्या वडिलांनी
उस्मानाबाद येथील पाच प्लॉट सना हिच्या नावावर केले होते. लग्नानंतर सासरच्या
मंडळींनी “तुझ्या लग्नात तुझ्या घरच्यांनी काही दिले नाही. तुला स्वयंपाक येत नाही”
असे म्हणुन सना हिचा जाच चालु केला. त्यानंतर काही दिवसांनी “प्लाॅट आमच्या
नावावर करुन दे, नाहीतर प्लॉट विकुन पैसे आम्हाला दे” असे म्हणुन शिवीगाळ व
मारहाण करु लागले. सना हिच्या आईवडिलांनी त्यांना बरेच वेळेस समजावुन
सांगितले परंतु तरीदेखील सासरची मंडळी तिचा प्लॉटकरिता छळ करीत होते व त्यांची
मागणी पुर्ण न झाल्याने नवरा इरफान, सासु आसिया, सासरे रज्जाक यांनी सना हिचा
मारहाण करुन गळा दाबुन खुन केला अशी फिर्याद सना हिच्या वडिलांनी माढा
पोलिस स्टेशन येथे दाखल केल्यावरुन सनाचे सासु-सासरे व नवरा यांना अटक
करण्यात आली होती. त्यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम ३०२, ४९८ (अ) प्रमाणे गुन्हा
दाखल झाला होता.
सदर प्रकरणातील आरोपी सासु-सासरे रज्जाक मोमीन व आसिया मोमीन
यांनी अॅडव्होकेट महेश जगताप यांचे मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. सदर
अर्जाची सुनावणी बार्शी येथील अति-जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.आर.एस.पाटील
यांचे समोर झाली. आरोपीच्या वतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन सनाच्या सासुसासऱ्यांना जामीन मंजुर केला.
यात आरोपीतर्फे अॅड.महेश जगताप (बार्शी), अॅड.भुषण माने यांनी तर सरकारपक्षातर्फे अॅड. डी.डी.देशमुख यांनी काम पाहिले.

Advertisement

Leave a Reply