October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

माढा तालुक्यातील मोडनिंब येथील युवक खुन प्रकरणी दोघांना जन्मठेप

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

मोडनिंब ता.माढा  येथील युवकाच्या खुनप्रकरणी मोडनिंब येथील दोघा आरोपींना बार्शीच्या अति. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अ. ब. भस्मे यांनी जन्म ठेपेची व पाच हजार रूपये दंडाची ठोठावली.

# गणेश सोनबा धोत्रे व दिपक सुनिल धोत्रे दोघेही, रा. मोडनिंब ता. माढा अशी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेल्याची नावे आहेत.

  #विकास अनिल धोत्रे असे मयत युवकाचे नाव होते.

  दिनांक १५/०९/२०१७ रोजी दुपारी १२ वाजता मोडनिंब येथील श्रीपाद माऊली मठामध्ये गणेश धोत्रे यांनी मयत विकास धोत्रे यांच्या डोक्यात दगड मारला व  दिपक धोत्रे यांनी त्याच्या हातातील चाकूने मयताचा गळा चिरुन खून केला होता. सदर घटना ही आरोपी व मयत यांच्या दरम्यान डुकराचे पिल्लू मारण्याचे कारणावरुन पुर्वीपासून वैमनस्य होते त्याचा राग मनात धरुन आरोपीनी मयत विकास धोत्रे यांचा खुन केला होता. सदर प्रकरणी मयताचा भाऊ विनोद धोत्रे यांनी आरोपींविरुध्द टेंभूर्णी पोलीस फिर्याद दिलेली होती.

यात सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात सरकार पक्षाचे वतीने अॅड दिनेश देशमुख  यांनी युक्तीवाद केला की,

सरकार पक्षाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी सदर घटना पाहिली आहे. तसेच सदर आरोपीनी घटनेच्या वेळेसचे वापरलेले कपडे व त्यावरील रक्ताचे डाग तसेच आरोपीनी गुन्हा करणेस वापरलेली हत्यारे व मयताच्या अंगावरील जखमा हया पोस्टमार्टम रिपोटमध्ये नमूद जखमा व साक्षीदाराने सांगितलेल्या जखमा हया एकमेकांशी सुसंगत आहेत तसेच ज्या हत्याराने मारले आहे सदर हत्यार व मयताचे अंगावरील जखमा हया आरोपीने गुन्हयाचे वेळेस वापरलेले हत्याराने होतात.
अशी साक्ष डॉक्टर यांनी दिली. आरोपीने सदर प्रकरण चालविताना घेतलेला बचाव हा सरकार

पक्षाने खोडून काढला व आरोपीने केलेला गुन्हा हा सरकार पक्षाने शाबीत केलेला आहे. असा युक्तीवाद ॲङ दिनेश देशमुख यांनी केला सर्व साक्षीदार व आरोपीविरुध्द असलेला पुराव्याचा विचार करता बार्शी येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. ब. भस्मे  यांनी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

सरकार पक्षा तर्फे ॲङ दिनेश देशमुख यांनी काम पाहिले. सदर प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी तसेच तपास अधिकारी म्हणून टेंभूर्णी पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरिक्षक आनंद खोबरे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून अमृत खेडकर यांनी काम पाहिले.

Leave a Reply