माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे दिल्लीत निधन,अहमदनगर व बार्शीवर दु:खाचे सावट

अहमदनगर, 17 मार्च: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते दिलीप गांधी (Dilip Gandhi
Advertisement
मंगळवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. काल दुपारपासूनच त्यांना दिल्लीतील खाजगी रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. बुधवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे.
दिलीप गांधी तीन वेळा नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार म्हणून निवडून आले होते. 2003 ते 2004 दरम्यान त्यांनी भाजप सरकारच्या काळात केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं.