March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

माजी आमदार कै.चंद्रकांत नाना निंबाळकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध — आमदार राजेंद्र राऊत


बार्शी ;-
बार्शी तालुक्यातील रस्तापूर येथे 2 कोटी 19 लाख रुपये किंमतीच्या साठवण तलावाचे भूमिपूजन आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
  यावेळी बोलताना आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की , आपल्या सर्वांचे दैवत माजी आमदार कै. चंद्रकांत नाना निंबाळकर यांचे स्वप्न होते की वैराग भागातील ही गावांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. बार्शी तालुक्यातील शेतकरी हा प्रगतशील व सधन असला पाहिजे हे माझे स्वप्न असून यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार आहे. त्याचबरोबर बार्शी तालुक्यातील इतर ठिकाणी नूतन पाझर तलाव, साठवण तलाव, बंधारे आदींच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पाण्याचा स्त्रोत वाढविण्यासाठी मी शासन दरबारी सतत प्रयत्न करत राहणार आहे. शेतकरी बांधवांच्या शेतीला जास्तीत जास्त कशा प्रकारे पाणी उपलब्ध करून देता येईल यासाठी माझे नेहमी धडपड व प्रयत्न असतात. मी नेहमी बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत एक स्वप्न पाहत आलो आहे ते म्हणजे माझ्या तालुक्यातील शेतकरी हा सधन व प्रगतशील झाल्यानंतर त्यांचे कुटुंब आर्थिक प्रगतीपथावर असले पाहिजे. त्यामुळे तालुक्याच्या अर्थकारण वाढीस त्यांचाही नक्कीच हातभार लागलेला असेल.
रास्तापूर येथे 2 कोटी 19 लाख रुपये खर्चून, पूर्वीच्या पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्यात येणार असून यामुळे या भागातील 100 एकर शेती पाटाने पाणी दिल्यानंतर ओलिताखाली येणार आहे.  त्याचप्रमाणे हेच पाणी ठिबक सिंचनाद्वारे वापरात आणले तर 700 एकर शेती ही ओलिताखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले.*
  यावेळी पं.स.सदस्य इंद्रजित चिकणे, बाजार समितीचे संचालक बापूसाहेब शेळके, माजी उपसभापती केशव घोगरे, जलसंधारण विभागाचे जिल्हा कार्यकारी अभियंता अण्णासाहेब कदम, उपविभागीय अभियंता धनंजय सावत्रे, शाखा अभियंता किरनाळे, प्रमोद मोरे, बाबासाहेब काटे, सरपंच दादासाहेब बरबडे, प्रताप बरबडे, धनराज बरबडे, बापूसाहेब बरबडे, श्रीकर बरबडे, प्रताप बरबडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply