October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मांडेगाव येथे आधार कार्ड शिबिर संपन्न

बार्शी;

मांडेगाव ता.बार्शी ग्रामपंचायत व डाक विभाग बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय नियमांचे पालन करत, मांडेगाव येथे आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बार्शी तालुक्याचे नायब तहसीलदार संजीव मुंढे ,  डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी अमित देशमुख,सरपंच पंडित मिरगणे व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांना वंदन करण्यात आले.

या शिबिरामध्ये नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करणे तसेच पोस्ट विभागाच्या वतीने जनतेसाठी राबविण्यात येत असलेल्या शासकीय विविध योजनांची माहिती देणे आदि उपक्रम राबविण्यात आले. पोस्ट विभागाच्या विविध योजनांची माहिती देत आपले गाव सुकन्या ग्राम व डिजिटल इंडिया ग्राम बनवण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी अमित देशमुख यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रबंधक माधव बारस्कर,डाक आवेक्षक अजित नडगिरे, रवींद्र बगाडे, पोस्टमास्तर नागेश कोळी,ब्रँच पोस्ट मास्तर मांडेगाव गणेश पवार,पांडुरंग भांगे ब्रँच पोस्ट मास्तर उंबर्गे,अंगणवाडी सेविका लता मिरगणे, लक्ष्मी शिंदे,सुनीता मिरगणे,सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply