महिलेची दुचाकी अडवुन चाकुचा धाक दाखवून सोने लुटल्याप्रकरणाचा बार्शी तालुका पोलिसांनी लावला छडा,तिघांना मुद्देमालासह अटक

सोलापूर;-महाराष्ट्र स्पीड न्युज
विदया विजय बनसोडे, वय: ३५ वर्षे, रा. हडपसर,
कृष्णा नगर पुणे यांना पाथरी ता.बार्शी येथील पुलाजवळ अडवुन चाकुचा धाक दाखवून सोन्याचे दागिणे, रोख रक्कम व घड्याळ लुटल्याप्रकरणाचा बार्शी तालुका पोलिसांनी छडा लावला.याप्रकरणी तिघांना मुद्देमालासह अटक करूण बार्शी न्यायालयात उभे केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दि दि. २३/११/२०२० रोजी १०.३० वा ते ११.०० वा चे
दरम्यान बनसोडे या त्या त्यांचे मानलेल्या भावाचे वडील लिंबाजी चोकोबा जानराव यांचेसोबत ज्युपीटर
मोटारसायकलवरुन पुणे येथुन भोपला, ता, केज, जि. बीड येथे जात असताना पाथरी गावचे
पुढे अंदाजे ५०० मी अंतरावर बार्शी-येरमाळा राडवर आले असता तीन अनोळखी इसमांनी
फिर्यादी यांचे मोटारसायकलवर मागे बसलेल्या लिंबाजी चोकोबा जानराव यांना धक्का देवुन
गाडीला लाथ मारुन दोघांनाही खाली पाडले व चाकुचा धाक दाखवुन फिर्यादी व त्यांचेसोबत
असलेले लिंबाजी चोकोबा जानराव यांच्याकडील एकुण ९५,५००/- रु. किंमतीचे दागिणे,
रोख रक्कम व घडयाळ असा मुद्देमाल बळजबरीने काढुण
घेतले होते.
पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर
पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर
यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शिवाजी जायपत्रे यांनी आरोपीचा शोध घेणेकामी दोन
पोलीस पथके तयार करुन पाथरी, येरमाळा भागात रवाना केले असता पाथरी येथे
उसतोडी कामगाराच्या पालावर संशयीत आरोपी नामे १) बाबा आबा काळे, वय: २१ वर्षे, रा.
तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता
त्याचेजवळ गुन्हयात गेलेले मनगटी घडयाळ, गुन्हयात वापरलेला चाकु व गुन्हयात
वापरलेली मोटारसायकल मिळुन आली. त्यावरुन त्यास अटक करुन मा. न्यायालयासमोर
हजर केले असता त्यास ६ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली. सदर तपासादरम्याण
सदर आरोपीने गुन्हयाची कबुली देवुन त्याचे साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर सदर
गुव्हयातील आरोपी २) लखन उर्फ नारायण भारत काळे, वयः २२ वर्षे, रा. खामकरवाडी,
ता. वाशी, जि. उस्मासनाबाद यास येरमाळा येथे ताब्यात घेतले. त्याचे जवळ गुन्हा करतेवेळी
मोटारसायकल मिळुन आली. त्याचेकडे गुन्हयातील गेले मालाविषयी चौकशी करता त्याने
सदर गुन्हयातील मुद्देमाल येरमाळा (उपळाई) येथील ३) विनोद रामेश्वर हारभरे, वय: २५
वर्षे, रा. उपळाई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद यास विकल्याचे सांगितल्यावरुन विनोद
हारभरे यास तात्काळ अटक केली. अटकेदरम्याण विनोद हारभरे याने सदर गुन्हयातील
सोन्याचे मनीमंगळसुत्र काठुन दिले. त्यानंतर लखन उर्फ नारायण भारत काळे
याने सदर
गुन्हयातील गेलेली रोख रक्कम पैकी ३,२००/- रु. काढुन दिले. ते सर्व गुन्हयाचे
तपासकामी जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपीतांकडुन एकुन १,९३,७००/- रु.
किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपींना न्यायमुर्ती धडके यांनी यांनी दि. ०१/१२/२०२० रोजीपर्यत पोलीस कोठडी रिमांड दिलेली
आहे .
सरकारी वकिल म्हणुन पी.जी.कुलकर्णी यांनी काम पाहीले. सदरचा गुन्हा
उघडकीस आणणेकामी बार्शी तालुका पोलीस ठाणेकडील स.पो.नि./शिवाजी जायपत्रे,
हवालदार राजेंद्र मंगरुळे,हवालदार सचिन माने, योगेश मंडलीक, अभय उंदरे,आप्पासाहेब लोहार, धनराज
फत्तेपुरे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे अन्वर आतार आदींनी परिश्रम घेतले.