October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

महिला फाटक्या जिन्स घालतात,हे कसले संस्कार? मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : आजकाल महिला फाटलेली जीन्स घालतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत? असं वक्तव्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी केलं आहे. त्यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री होऊन काही दिवस उलटत नाहीत, तोच ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Advertisement

बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या एका कार्यशाळेचं आज मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी एक किस्साही सांगितला.

मी एकदा जहाजातून प्रवास करत होतो, तेव्हा तिथे एक महिला आपल्या २ मुलांसोबत होती, आणि तिने फाटलेली जीन्स घातलेली. मी जेव्हा तिला विचारलं की तुम्हाला कुठे जायचं आहे?

तेव्हा तिने सांगितलं की मी दिल्लीला जात आहे. माझे पती JNU मध्ये प्राध्यापक आहेत, आणि मी एक NGO चालवते.’

पुढे रावत म्हणाले, ‘तेव्हा मी विचार केला की, जर NGO चालवणारी महिला असे कपडे परिधान करत असेल, तर ती समाजाला कशाप्रकारे संस्कार घडवेल? आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं कधीच नसायचं.

मुलांवर कसे संस्कार होतायत, हे सर्वस्वी पालकांवर असतं, असंही मुख्यमंत्री रावत यांचं मानणं आहे.

आपल्या देशातील युवक हे पाश्चात्य संस्कृती आपलीशी करतायत, हे चिंताजनक आहे, अशी भीतीही रावत यांनी व्यक्त केली.

Leave a Reply