महाविद्यालय सॅनिटायझेशन करण्यासाठी अभाविपच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

बार्शी :
नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या महाविद्यालयांचे सॅनिटायजेशन करण्याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बार्शी शाखेच्या वतीने मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांना निवेदन देण्यात आले.
दिनांक १५/२/२०२१ पासुन उच्च शिक्षण व तंत्र मंत्री यांच्या आदेशानुसार महाविद्यालये उघडण्यात येणार आहेत.गेल्या बऱ्याच महिन्यांपासुन अ.भा.वि.प. च्या इतक्या महिन्याच्या संघर्षाला अखेर दि.३/२/२०२१ रोजी यश आले.त्याच्याच पार्श्वभुमीवर सर्व संबंधित महाविद्यालये सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टी कोनातून महाविद्यालय सॅनिटायझेशन करण्याचे आदेश द्यावे ही विनंती. केली यावेळी अभाविपचे जिल्हा संघटन मंत्री अमरदीप वाय गावकर शहराध्यक्ष तात्यासाहेब घावटे, शहर मंत्री अभिषेक खाडे, सुमित जगदाळे, लखन भंडारी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.