महावितरणाविरोधात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन

सोलापूर: महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी येथे आ. राजेंद्र राऊत व विजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी बार्शी तालुक्याच्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर, महावितरणाने दिलेल्या 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या लुटारू सरकारच्या विरोधात तसेच महावितरणाच्या निषेधार्थ बार्शी महावितरण केंद्रांवर “टाळा ठोको व हल्लाबोल“ आंदोलन केले कोरोनाच्या कठीण काळातसुद्धा आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला दुप्पट तिप्पट वीज बिल पाठवून आता वीज बिल कनेक्शन तोडण्याची धमकी देणाऱ्या ठाकरे सरकारला आपण सारे मिळून धडकी भरवल्याशिवाय शांत बसायचे नाही. आपल्या प्रियजनांना सर्वच गोष्टींमध्ये सूट दिली मात्र गोर गरीब जनतेला भरमसाट वीज बिल पाठवून सवलत देण्याचं आश्वासन देऊन आता दुटप्पी भूमिका ठाकरे सरकारने का घेतली? आणि जर विज बिल माफ नाही केले तर या पुढे तीव्र स्वरूपात आंदोलन करु असा इशारा विजय राऊत यांनी दिला तसेच लेखी निवेदन कार्यकारी अभियंता लहामगे यांना दिले
या आंदोलनाला बार्शी नगर पालिकेचे गटनेते विजय राऊत,भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष मदन दराडे,शहर अध्यक्ष महावीर कदम,जिल्हा सरचिटणीस धनंजय जाधव,जिल्हा उपाध्यक्ष केशव घोगरे,महिला जिल्हा अध्यक्ष सौ पद्मजा काळे,महिला जिल्हा उपाध्यक्ष अॅड.राजश्री तलवाड,सहकार सेल जिल्हा अध्यक्ष कुंडलिकराव गायकवाड,शहर अध्यक्ष सौ रुपाली ढगे, शहर उपाध्यक्ष सौ.सुगंधा आगवणे पंचायत समिती सभापती अनिल डिसले,माजी उपसभापती अविनाश मांजरे,बार्शी नगरपालिकेचे आरोग्य समिती सभापती संदेश काकडे,बांधकाम समिती सभापती रोहित लाकाळ,पाणीपुरवठा सभापती भैय्या बारंगुळे,नगरसेवक रितेश वाघमारे,नगरसेवक भारत पवार,नगरसेवक दीपक आबा राऊत,नगरसेवक फुरडे,नागरसेवक कय्युम पटेल,नगरसेवक काका फुरडे,नगरसेवक अमोल चव्हाण, नगरसेवक विजय चव्हाण,युवा नेते अजित बारंगुळे, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा तालुका अध्यक्ष शकील मुलाणी,प्रसिद्धी प्रमुख किरण कोकाटे,प्रशांत खराडे,गणेश बप्पा डमरे,अजय बप्पा जगताप,डॉ. विलास लाडे,वैभव शिंदे,ओबिसो सेल तालुका उपाध्यक्ष दत्ता देवकर,सौ.शैलेजा गीते,पिंटु यादव,फारूक काझी,आदी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.