October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

महाराष्ट्र शासनाच्या अनलाॅक 6 च्या गाईडलाईन जारी

मुंबई | राज्य सरकारकडूनही अनलॉक ६ च्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक ६ साठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्याअंतर्गत अनलॉक ५ मधील गाईडलाईन्स ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.

हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहेत. ई पासची आवश्यकता नाही. तसेच, अंतर पाळणे आणि मास्क वापरणे आवश्यक आहे. मेट्रो सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालय अद्याप सुरू करण्याचा निर्णय घेतला नाही आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या गाईडलाईन्स नुसार, कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.

एका राज्यातून दुसर्‍या राज्यात व्यक्ती व वस्तूंच्या आंतरराज्यीय वाहतुकीवर कोणतेही बंधन नाहीत. यासाठी स्वतंत्र परवान्याची आवश्यकता लागणार नाही. ही सवलत अनलॉक 5 मध्ये देण्यात आली होती.

३० नोव्हेंबर, २०२० पर्यंत कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता प्रतिबंधित उपायांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल. कंटेनमेंट झोनची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आणि राज्य, केंद्रशासित प्रदेशांनी संकेतस्थळावर प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Reply