March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

महाराष्ट्र विद्यालयात पत्रकारांचा गौरव

बार्शी;-
                            महाराष्ट्र विद्यालयात श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी व महाराष्ट्र विद्यालय बार्शी यांच्या संयुक्त विद्यमानाने पत्रकारांचा गौरव सोहळा पार पडला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.किरण गाढवे यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.शि.शि.प्र.मं. बार्शी चे सचिव व्ही.एस.पाटील हे होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहसचिव श्री पी.टी.पाटील व संस्थेचे सांस्कृतिक विभाग चेअरमन श्री जयकुमार शितोळे हे होते.तसेच विद्यालयाचे प्राचार्य डी.बी.पाटील, उपप्राचार्य एल.डी.काळे,पर्यवेक्षक श्री व्ही.एन. लिमकर, श्री.जी.ए.चव्हाण, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या  बी.के.गव्हाणे, सचिन वायकुळे,अजित कुंकुलोळ, संतोष सुर्यवंशी,शहाजी फुरडे,प्रशांत काळे,गणेश गोडसे, चंद्रकांत करडे,मल्लीकार्जुन धारूरकर, सचिन अपसिंगकर, विजय निलाखे, संजय बारबोले,नंदकुमार माढेकर, गणेश भोळे,नितीन भोसले,गणेश घोलप,विनोद ननवरे,अमर आवटे या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  ए.एन. कसबे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.संजय बागल यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अतुल नलगे व दयानंद रेवडकर यांनी परिश्रम घेतले.

Advertisement

Leave a Reply