October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

महाराष्ट्र  राज्य युवा शारीरिक  शिक्षक शिक्षक  महासंघाचा वर्धापनदिन साजरा

बार्शी महाराष्ट्र स्पीड न्युज
:-स्वामी विवेकानंद च्या विचाराचा वारसा घेऊन  युवा दिनाचे औचित्य साधून संदीप मनोरे सर व तायप्पा शेंडगे सर यांनी स्वप्न बलशाली भारताचे हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र  राज्य युवा शारीरिक  शिक्षण शिक्षक  महासंघाची स्थापना केली वर्षे पूर्ती निमित्ताने सोलापूर जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन केले वर्षेभरात मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यात युवा महासंघाचा विस्तार केला , शारीरिक शिक्षण विषय अनेक प्रश्न होते प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या महासंघाची स्थापण केली. पुढे बोलताना
सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रदीप नवले सर यांनी या कार्यक्रमात आपले मनोगत वक्त करताना म्हनाले की
आरोग्य हा  जगातील  प्रत्येक, विद्यार्थी , व्यक्तीच्या आयुष्यातील  सर्वांगीण विकासामधील एक महत्वाचा घटक आहे.
जीवनात यशस्वी  व्हायचे   असेल तर त्याचे स्वास्थ्य चांगले असणे आवश्यक आहे.बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांचेच शारीरिक कष्ट कमी झाले आहे.सध्याचे युग हे माहीती व तंत्रज्ञानाचे युग आहे.या युगामध्ये शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम नागरिक तयार करणे आज आव्हान बनले आहे.तंत्रज्ञानाशिवाय तर पर्याय नाही.
माणुस हा बुद्धीवान प्राणी.तो आपल्या बुद्धीच्या जोरावर आजुबाजुचे वातावरण बदलतो आहे.मात्र या सर्व बदललेल्या जीवनशैलीमुळे माणसाचे शारिरिक कष्ट व शुद्ध मोकळी हवा यापासुन कोसो दुर गेला आहे.शिक्षण  व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक , मानसिक , बौद्धिक , सामाजिक विकासासाठी , व शिक्षण  घेण्यास सक्षम होण्यासाठी , सदृढ समाज निर्मिती, बलशाही भारतासाठी ,देशाच्या आर्थिक प्रगती साठी, आँलिम्पिंक मधील पदके वाढविण्यासाठी आणि  अत्यंत  महत्त्वाचे  म्हणजे  प्रत्येक  विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारक शक्ती  वाढविण्यासाठी *” आरोग्य व शारीरिक  शिक्षण “* विषयाची अत्यावश्यक गरज  झालेली  आहे, हे  संपूर्ण जग कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर *”आरोग्य “* या घटकावर अनुभव घेत आहे , म्हणून “आरोग्य  व शारीरिक  शिक्षण ” आणि   शारीरिक शिक्षण शिक्षक , बलशाली भारतासाठी , शिक्षण  व्यवस्थेत महत्त्वाचा आहे.सदरील कार्यक्रमासाठी अमोल मिरगणे, सागर सातपुते, मंगेश पवार, रोहित डिसले,
अजय पाटील,  रोहित कांबळे, अलोक शिंदे,  सागर देशमुख
आदी शारीरिक शिक्षक उपस्थित होते..

Advertisement

Leave a Reply