महाराष्ट्र टिचर असोसिएशनच्या वतीने धुळे शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

धुळे;- महाराष्ट्र स्पीड न्युज
महाराष्ट्र टिचर असोसिएशनच्या वतीने आज शिक्षणाधिकारी कार्यालयावर शासनाने शिपाई भरती बंद केले च्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
दिनांक ११ डिसेंबर २०२०रोजी राज्य शासनाने खाजगी अनुदानित शाळामधील ‘शिपाई’ संवर्गातील पदासाठी नियमित वेतनश्रेणी ऐवजी ‘ठोक मासिक शिपाईभत्ता’ देण्याचा आदेश काढला आहे.या आदेशाला शिक्षक, शिक्षकेतर वर्ग आणि संघटना यांचा विरोध आहे.हा आदेश विनाविलंब मागे घ्यावा अशी सर्व संघटनांची मागणी आहे.यासाठी *महाराष्ट्र राज्य टिचर असोसिएशन शिक्षक,शिक्षकेतर संघटना राज्यभरात काळया फिती लावुन काम करणार आहे.याचदिवशी १८डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी ११.३० वा. संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प.धुळे यांना ११डिसेंबर २०२० रोजीचा आदेश रद्द करणेसंबंधीचे निवेदन धुळे शिक्षणाअधिकारी माननीय श्री मनीष पवार साहेब यांना देण्यात आले,
यावेळी महाराष्ट्र टिचर असोसिएशनच्या राज्य अध्यक्ष शुभांगीताई पाटील, यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.