महाराष्ट्राची आर्थिक स्थिती का व कशी ढासळतेय..

आज (8 मार्च) विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आज राज्येच बजेट सादर करतील.
देशात क्रमांक एकचं राज्य कुठलं असा प्रश्न विचारला तर महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जाण्याची शक्यता आहे.
पण, तुमचा-अमचा महाराष्ट्र मात्र सध्याच्या स्थितीत तरी देशात क्रमांक एकचं राज्य नाही. निदान जीएसडीपी म्हणजेच सकल राज्य उत्पादनच्या बाबतीत तरी नाही. महाराष्ट्र सरकारनं शुक्रवारी (5 मार्च 2021) विधिमंडळात मांडलेला राज्याचा आर्थिक पाहाणी अहवाल हेच सांगतोय.
हरियाणा, तेलंगाणा, कर्नाटक आणि तामिळनाडू ही राज्य जीएसडीपीच्या (Gross state domestic product – सकल राज्य उत्पादन) बाबतीत महाराष्ट्रच्या बरीच पुढे गेली आहेत.
बरं हे यंदाच्या वर्षीच झालंय आणि त्याला कोरोनाचं कारण आहे असं अजिबात नाही.
गेल्या 10 वर्षांमध्ये प्रसिद्ध झालेले आर्थिक पाहाणी अहवाल पाहिले तर 2013 पर्यंत राज्याची स्थिती ठिक होती. म्हणजे 2010-11 च्या अहवालानुसार जीएसडीपीच्या बाबतीत महाराष्ट्र क्रमांक एकचं राज्य होतं.
पण 2012-13 पासून मात्र स्थिती बदलायला सुरुवात झाली. 2012-13 मध्ये हरियाणानं जीएसडीपीच्या बाबततीत महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकावर ढकलंल. त्यानंतर 2015-16 मध्ये कर्नाटक महाराष्ट्राच्या पुढे गेलं.
त्यानंतर मात्र महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचं स्थान टिकवता आलेलं नाही. 2017-18मध्ये तेलंगाणा आणि कर्नाटक पुढे निघून गेले. तर 2018-19मध्ये हरियाणा, कर्नाटक, तेलंगाणा आणि तामिळनाडूनंतर महाराष्ट्राचा नंबर आला. सध्याचा विचार केला तर आर्थिक पाहणी अहवाल 2020-21 नुसार महाराष्ट्र जीएसडीपीच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावरचं राज्य आहे.
असं का आणि कसं झालं. महाराष्ट्राला स्वतःचा क्रमांक का टिकवता आला नाही? महाराष्ट्र कमी पडला की इतर राज्यांनी त्यांची मेहनत वाढवली? नेमकी काय कारण आहेत ज्यामुळे महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या पिछाडीवर का गेला आहे.
महाराष्ट्रच्या विकासाचा दर इतर राज्यांच्या तुलनेत अधिक वेगाने वाढला नसला तरी तो घसरलेला नाही, असं डॉ. अदिती सावंत सागतात. डॉ. अदिती या मुंबईतल्या सेंट झेवियर्स कॉलेजच्या अर्थशास्त्र विभाग प्रमुख आहेत.
शेतीकडे दुर्लक्ष
पण आपण जर सेक्टरनुसार अभ्यास केला तर महाराष्ट्रातील शेती व्यवसाय हा गेल्या काही वर्षात निगेटिव्ह ग्रोथ दाखवतो, असं डॉ. अदिती सांगतात.
“मी शेती संदर्भात केलेल्या संशोधना काही गोष्टी प्रकर्षाने आढळून आल्या. उदाहरणार्थ गुजरातमध्ये शेती ही व्यावसायिक तत्त्वावर आणि कॉन्ट्रॅक्ट पद्दतीने केली जाते. याउलट महाराष्ट्रात कुटुंबातील व्यक्ती तसंच शेतमजूर किंवा भाडे तत्त्वावर आणलेली शेतीसाठीची जनावरं, अवजारं यांचे प्रमाण अधिक आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये शेतीत पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक पायभूत सुविधा, धान्य साठवणुकीसाठी शीतगृहं आणि प्रोसेसिंग युनिट्सकडे दुर्लक्ष झालेलं दिसून येतं. याचा एकंदर परिणाम शेतीच्या प्रगतीवर आणि उत्पादनावर झालेला दिसतो,” डॉ. अदिती सांगतात.
महाराष्ट्र पिछाडीवर जाण्याची प्रमुख कारणं
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतर राज्यांच्या तुलनेत मागे पडण्याची वेगवेगळी कारणं आहेत, असं ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंत थोरात बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात. यशवंत थोरात हे नाबार्डचे माजी अध्यक्ष आहेत.
त्यातील ते 5 प्रमुख कारणं ते सांगातात.
- योग्य धोरणांचा अभाव
- योग्य खर्चाचा अभाव
- योग्य प्रशिक्षित कमगारांचा अभाव
- भ्रष्टाचार
- राज्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी धोरणात्मक निर्णयांचा अभाव
थोरात सांगतात, “आपली धोरणं आणि खर्च शाश्वत नसतील, जी धोरणं आणि खर्च आपण करत आहोत त्यांचं प्रत्यक्ष जमिनीवर प्रतिबिंब दिसत नसेल तर ते राज्याच्या दृष्टीने हानिकारक आहे.”
2010 नंतर महाराष्ट्रात आलेल्या सरकारांनी योग्य प्रकारे निधीचा खर्च केला नाही. तो केला असता तर त्यांची फळं प्रत्यक्षात दिसली असती. विकास कामांपेक्षा इतर लोकप्रिय गोष्टींवर खर्च करण्याकडे सरकारांचा कल वाढलाय.
“शिवाजी महाराज राज्यातल्या प्रत्येकाच्या मनात आहेत. मीही तुमच्या एवढाच त्यांचा आदर करतो. पण खरंच आता महराज हयात असते तर त्यांनी त्यांच्या पुतळ्याला प्राधान्य दिलं असतं की लोकांच्या तोंडात दोन घास टाकणाऱ्या धोरणांना?” थोरात प्रश्न विचारतात.
राज्याची वित्तीय तुट जास्त आहे, पण त्या पैशाचा योग्य ठिकाणी खर्च झाला असता तर त्याचा नक्कीच फायदा झाला असता, असं थोरात यांना वाटतं. या आणि यासारखे इतर अनेक धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेणे गरजेचे आहे.
‘प्रशिक्षित मनुष्यबळात महाराष्ट्र मागे का?’
कामगारांच्या मुद्द्यावर बोलताना थोरात त्यांचे अनुभव सांगतात. थोरात हे सध्या काही मोठ्या कंपन्यांच्या बोर्डांवर काम करत आहेत.
ते सांगातत, “आमच्याकडे नोकऱ्या मागण्यासाठी अनेक मंडळी येतात, त्यांचं शिक्षण चांगलं असतं पण त्या शिक्षणाचा त्यांना देण्यात येणाऱ्या नोकरीशी फार कमी संबंध असतो.
कोकणातल्या एका हॉटेलात आलेला अनुभव ते सांगातात, “कोकणात एका चांगल्या हॉटेलात त्यांच्या काउंटरवरचा सर्व स्टाफ ईशान्येकडच्या राज्यांचा होता. तर त्यांच्या किचनमध्ये काम करणारी मंडळी ही बिहारी होती. मराठी मंडळी यात कुठेत? त्याचं कारण योग्य प्रशिक्षणात आहे.
ईशान्येकडच्या लोकांनी कोकणात येऊन काम करण्याचा मला भारतीय म्हणून आनंदच आहे. पण आपला मराठी माणूस कामासाठी ईशान्येकडे गेला आहे का. लेबर फोर्सचं हे आदानप्रदान झालं आहे का,” डॉ. थोरात आणखी एक प्रश्न उपस्थित करतात.
मनुष्यबळाचं योग्य प्रशिक्षण हा तर मुद्दा आहेच. पण त्याच जोडीला बेरोजगारी हासुद्धा महाराष्ट्राच्यापुढे सध्याच्या घडीला आ वासून उभा असलेला प्रश्न आहे.
महाराष्ट्रात शेतीनंतर बांधकाम उद्योग रोजगार निर्मितीच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचं क्षेत्र असल्याचं त्या सांगतात.
कोकणातल्या एका हॉटेलात आलेला अनुभव ते सांगातात, “कोकणात एका चांगल्या हॉटेलात त्यांच्या काउंटरवरचा सर्व स्टाफ ईशान्येकडच्या राज्यांचा होता. तर त्यांच्या किचनमध्ये काम करणारी मंडळी ही बिहारी होती. मराठी मंडळी यात कुठेत? त्याचं कारण योग्य प्रशिक्षणात आहे.
ईशान्येकडच्या लोकांनी कोकणात येऊन काम करण्याचा मला भारतीय म्हणून आनंदच आहे. पण आपला मराठी माणूस कामासाठी ईशान्येकडे गेला आहे का. लेबर फोर्सचं हे आदानप्रदान झालं आहे का,” डॉ. थोरात आणखी एक प्रश्न उपस्थित करतात.
मनुष्यबळाचं योग्य प्रशिक्षण हा तर मुद्दा आहेच. पण त्याच जोडीला बेरोजगारी हासुद्धा महाराष्ट्राच्यापुढे सध्याच्या घडीला आ वासून उभा असलेला प्रश्न आहे.
महाराष्ट्रात शेतीनंतर बांधकाम उद्योग रोजगार निर्मितीच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचं क्षेत्र असल्याचं त्या सांगतात.
महाराष्ट्राच्या तुलनेत दक्षिण भारतातील राज्याकडे पाहिले तर त्या राज्यांनी धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांचं संवर्धन करून टुरिझममधून त्या राज्याची अर्थव्यवस्था मजबूत केलल्याचं दिसून येतं. या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राकडे प्रचंड मोठा टुरिझमसाठी वाव असून त्याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष दिल्यास महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल,” अस सल्लाही थोरात देतात.
‘पुन्हा महाराष्ट्र नंबर-1 होईल’
पण राज्याच्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर या परिस्थितीला मात्र आधीच्या सरकारला जबाबदार धरतात.
गेल्या 5 वर्षांमध्ये भाजप सरकारने महाराष्ट्रातली सर्व अर्थव्यवस्था गुजरातला कशी जाईल याकडे लक्ष दिलं त्यामुळे हे असं घडलं आहे. आधीच्या सरकारमध्ये आमची काही महत्त्वाची भूमिका नव्हती,” असा आरोप ते करतात.
पण जगभरात आर्थिक वाढ कमी होत आहे, तसंच तेलाचे भाव वाढत आहेत. त्यामुळे जगातल्या परिस्थितीचाही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर परिणा होत असल्याचं क्षीरसागर यांचं म्हणणं आहे.
दरम्यान “गुंतवणूक कशी वाढले याकडे आता सरकार जास्त लक्ष येत आहे. पुढच्या काळात तुम्हाला महाराष्ट्र पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर दिसेल,” असा दावा क्षीरसागर करतात.