महामानव संस्थेचे कार्यकौतुकास्पद : सा पो नि शिवाजी जायपत्रे गुळपोळीत शिवजयंती निमित्त आधार कार्ड शिबीर संपन्न

बार्शी ;-
तालुक्यातील गुळपोळी येथील महामानव बहुद्देशीय सामजिक संस्था व भारतीय डाक
विभाग बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय
नियमांचे पालन करत, गुळपोळी येथे शिवजयंती निमीत्त आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे व दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी गणेश गोडसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी अमित देशमुख होते.
बार्शी पंचायत समितीचे सदस्य इंद्रजित चिकणे , शिरीष चिकणे, कृष्णा चिकणे ,कैलास नाना माळी ,अमोल नरखडे ग्रामपंचायत सदस्य , अखिल भारतीय नाथ पंथी डवरी गोसावी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संजय चव्हाण , माजी सरपंच दत्तात्रय काळे तंटा मुक्त अध्यक्ष गणेश चिकणे , ग्रामसेवक वैभव माळकर, तलाठी रावसाहेब देशमुख , पोलीस पाटील बाळकृष्ण पिसे आदी मान्यवर उपस्थित होते
प्रमुख पाहुणे बार्शी तालुका स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, दैनिक पुढारीचे पत्रकार गणेश गोडसे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर संत गाडगे बाबा जयंती निमीत्त आज प्रतिमेला पुष्पहार कृष्णा चिकणे गणेश चिकणे इंद्रजित चिकणे यांच्या हस्ते घालण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमूख पाहुणे बार्शी तालुका पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी यांच्या हस्ते महापुरुषांचे पुस्तक गुलाब देऊन सत्कार करण्यात आला.विविध मान्यवरांचे यावेळी पुस्तक गुलाब सत्कार करण्यात आले
या शिबिरामध्ये नवीन आधार कार्ड काढणे, डिजिटल
आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करणे तसेच पोस्ट पुढाकार
विभागाच्या वतीने जनतेसाठी राबविण्यात
येत आहे.पोस्ट विभागाच्या विविध योजनांची
माहिती देत आपले गाव सुकन्या ग्राम व
डिजिटल इंडिया ग्राम बनवण्यासाठी युवकांनी
प्रयत्न केले विविध योजने बद्दल माहिती डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी अमित देशमुख
बोलत होते.
विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आधारकार्ड शिबिरांस चांगला प्रतिसात मिळाला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, नितीन पाटील ,किरण खुरंगळे, गणेश लंगोटे, शिरीष चिकणे, कृष्णा चिकणे ,गुलाब शेख ,योगेश चिकणे ,प्रसाद पाटील ,बाळकृष्णा पिसे ,गणेश चिकणे, उल्हास सुतार, गणेश लंगोटे, प्रणाली प्रबंधक माधव बारसकर, पंजाबराव कराड , दिपक काकडे, डाक आवेक्षक रविंद्र बगाडे,अजित नडगिरे, घनश्याम क्षिरसागर, लक्ष्मण काळे, प्रतिक वैद्य, ज्ञानेश्वर काळे, लक्ष्मण घेवारे, कल्याणी पाटील, परमेश्वर माचले ,दत्तात्रय चौधरी ,लखन चौधरी ,संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ बार्शी पोस्ट ऑफिसचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना सूत्रसंचालन भैरवनाथ चौधरी तर आभार प्रदर्शन नितीन पाटील यांनी मानले