March 30, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

महापुरूषांची विटंबना,आ.राजेंद्र राऊत यांना धमकी,बार्शीत कडकडीत बंद

सोलापूर ; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

महापुरूषांची विटंबना व आ. राजेंद्र राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ आज बुधवार दि.10 मार्च 2021 रोजी पुकारण्यात आलेल्या बार्शी बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.बंद शांततेत पार पडला.

शासकीय कार्यालयासह  मेडिकल, दवाखाने या अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील बाजारपेठेतील बहुतांशी दुकानदारांनी आपले व्यवसाय बंद ठेऊन बंदमध्ये सहभाग घेतला होता.
बार्शी शहरातील पांडे चौक, सोमवार पेठ, तहसील परिसर ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स, नवी चाटी गल्ली,भोसले चौक,बस स्थानक चौक आदी भागात ही दुकाने बंद असल्यामुळे शुकशुकाट जाणवत होता.ग्रामीण भागातून शासकीय कामासाठी येणाऱ्या जनतेनेही ही आपली कामे पुढे ढकलून बार्शीला येण्याचे टाळले होते.

#दोन पोलीस निरीक्षक, सात सपोनी व पोलीस उपनिरीक्षक, साठ पोलीस कर्मचारी ,एक दंगा काबु पथक असा  बंदोबस्त शहरासाठी तैनात करण्यात आला होता.

या बंद मध्ये व्यापारी महासंघ, दि बार्शी मर्चंट असोसिएशन, कापड बाजार असोसिएशन,किराणा बाजार असोसिएशन, सराफ असोसिएशन,स्टेशनरी व जनरल असोसिएशन
,पान मसाला असोसिएशन, भांडी बाजार असोसिएशन, होटेल असोसिएशन, कॅटल फुड असोसिएशन, मोबाईल असोसिएशन,डाळ मिल असोसिएशन, हमाल तोलार संघटना, मेडिकल असोसिएशन, सिमेंट असोसिएशन,खते व बी-बियाणे असोसिएशन, बार्शी इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, सकल मराठा समाज बार्शी तालुका, शिवप्रेमी संघटना, शिवभक्त मावळ्यांनी सहभाग घेतला.
उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष  गिरिगोसावी यांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply