October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

महागांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.जनाबाई  पवार , उपसरपंचपदी हनुमंत मोरे

बार्शी ;
महागांव ता.बार्शी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जय हनुमान महाविकास आघाडीच्या सौ.जनाबाई राजू पवार व उपसरपंचपदी हनुमंत संभाजी मोरे यांची बिनविरोध झाली. निवडणूक अधिकारी म्हणून काशिद यू.बी यांनी काम पाहिले.  यावेळी ग्रामसेवक खोबरे एस.एस  उपस्थित होते. 7 ग्रामपंचायत सदस्य आसलेल्या महागांव ग्रामपंचायतीमध्ये जय हनुमान महाविकास आघाडीने 5 जागा जिंकून बहुमत प्राप्त करून ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला. सदर निवडी प्रसंगी सौ. जनाबाई राजू पवार, हनुमंत संभाजी मोरे,सौ.अश्विनी अरूण पाटील, सौ.दिपाली विशाल चापले, सौ.ज्योती मेघनाथ गायकवाड हे नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
   निवडीनंतर नूतन सरपंच,उपसरपंच,सदस्य यांचा सत्कार सोसायटी चेअरमन कल्याण घोलप,माजी सरपंच बाळासाहेब पाटील, मा. उपसरपंच बिभीषण घोलप, सुभाष घोलप, अनिल घोलप ,शालेय समिती अध्यक्ष संतोष गोरख घोलप , विलास कोकरे, विलास घोलप, तंटामुक्त समिती अध्यक्ष आण्णासाहेब पाटील,अरूण पाटील  या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी  शंकर वसंत घोलप,शहाजी घोलप, श्रीहरी मोरे, विजयकुमार घोलप, हनुमंत कांबळे, कमलाकर चापले,डॉ. अमोल मोरे,डॉ.मेघनाथ गायकवाड, उमेश घोलप,शंकर मोरे,शंकर चापले, शशिकांत  मोरे,विशाल चापले,समाधान पाटील,रामभाऊ चापले,नारायण चापले, मारूती कोकरे,सुखदेव ढावारे,मोहन गायकवाड, पोपट महाराज घोलप, बाबा मोरे, लक्ष्मण चापले, ऋषीकेश पाटील ,धर्मराज चापले,दयानंद कोकरे,गोरख  कोकरे व गावातील  ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,  ग्रामस्थांनी सरपंच ,उपसरपंच, नवनियुक्त सदस्य यांचे  अभिनंदन करून  पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Leave a Reply