June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मळेगाव येथे संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी

बार्शी;

समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा,भोळ्या समजुती, रूढी परंपरा,दूर करण्यासाठी ज्यांनी आपले संपुर्ण आयुष्य वेचले,देव दगडात नसून तो माणसात आहे हे सर्वसामान्य माणसाच्या मनावर ठसवण्याचा पर्यन्त केला असे समाजसुधारक व स्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा यांची जयंती मळेगाव ता.बार्शी येथे श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने ग्रामपंचायत मळेगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
   या यावेळी गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन कोरोनाच्या काळात गाव कोरोना मुक्त ठेवण्यासाठी अविरत पणे प्रयन्त केले,त्या मळेगाव ग्रामपंचायत च्या सदस्या पूजा इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी यशदाचे शिवाजी पवार,तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर शेख,सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी,महाराष्ट्र राज्य धनगर समाज सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सागर शेळके,यशवंत गाडे,लिगायत समाज्याचे संतोष गुजर,जयवंत गाडे,शकर जाधव,मुन्ना शेख,ग्रामपंचायत संगणक परिचालक प्रशांत पटणे,आरोग्य कर्मचारी रुकुम अडगळे,आदी मान्यवर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते

Leave a Reply