October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मळेगाव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

बार्शी;-महाराष्ट्र स्पीड न्युज

6 डिसेंबर हा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करण्यात येतो,पिढ्यान पिढ्या जाती पतीच्या जखाडात अडकून अन्याय करणाऱ्या जनतेला दिशा दाखवणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन प्रेरणादायी होते त्यामुळे मळेगाव ता.बार्शी येथे श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले, सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन वारकरी साहित्य परिषदेचे वसंत नलावडे व शिवाजी आधारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी, वारकरी साहित्य परिषदेचे सचिव चंद्रकांत मुबरें,सदस्य भारत माळी, ग्रामपंचायत क्लार्क सुरेश कांबळे,संघनक परिचालक प्रशांत पटणे,आरोग्य कर्मचारी रुकुम आडगळे,अंकुश जाधव,आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply